सलमान खान आणि अक्षय कुमार बॉलिवुडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी ओळखले जातात. एक बॉलिवुडचा दबंगखान तर एक खिलाडी असून दोघेही इंडस्ट्रीमधील माहागडे कलाकार आहेत. आपण या दोघांची ‘मुझसे शादी करोगी‘ या चित्रपटामध्ये धमाकेदार मैत्री तर पाहिलीच असेल. वैयक्तीक आणि प्रोफेशनल आयुष्यामध्ये ते सतत एकमेकांना पाठिंबा देताना दिसून येत असतात. नुकतंच सलमानने अक्षयाच एक व्हिडिओ आपल्या इंस्टस्टोरीला शेअर केला आहे.
बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार सलमान खान (Salman Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) हे दोघेही वैयक्तीक आयुष्यामध्ये खूप चांगले मित्र आहेत. काही दिवासांपूर्वी अक्षयने एका रियालीटी शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा तिथे त्याला त्याच्या बहिनीने म्हणजेच अल्का भाटिया (Alka Bhatia) हिने व्हिडिओद्वारे एक संदेश दिला होता. तो व्हिडिओ आणि त्यामधला संदेश ऐकल्यानंतर अक्षय खूप भावूक होतो आणि त्याला अश्रू अणावर होतात. अक्षयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अक्षयचा व्हायरल झालेली व्हिजिओ क्लीप सलमानने आपल्या अधकृत इंस्टग्राम अकाउंटवरुन स्टोरी शेअर करत अक्षयला एक मेसेज दिला आहे. सलमानने स्टोरी शेअर करत लिहिले की, “मी आत्ता असं काही पाहिलं आहे. जे पाहुन मला वाटत आहे की, हे सर्वांना शेअर केले पाहिजं. देव तुला आशिर्वाद देवो, खरच अविश्वसनीय, हे पाहुन मला फार चांगले वाटले. फिट राहा, काम करत रहा आणि देव सदैव तुझ्या पाठीशी उभा राहो अशीच सदिच्छा!”
सलमानची स्टोरी पाहिल्यानंतर अक्षयने देखिल त्याला रिप्लाय देत लिहिले की, “तुझ्या मेसेजमुळे मला खूप आनंद झाला आहे.सलमान देवाची कृपा तुमच्या वरही सदैव राहो, यशस्वी हो.” अशा प्राकारे यांच्यामधली मैत्री पाहून चाहत्यांनाही खूप आनंद झाला आहे. चाहत्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवर भरभरुन प्रेम दिले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बेशरम रंग’वर ‘बबिता जी’ने हद्दच केली पार; चाहते म्हणाले, ‘आंटी चित्रपट फ्लॉप…’
‘भगव्या’ रंगाचा वाद विकोपाला! बिहार न्यायालयात ‘या’ कालारांवर नोंदवली तक्रार