Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड सलमान खानच्या बहिणीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! विश्वासघात करत नाेकराकडून ‘हे’ घाणेरडं कृत्य

सलमान खानच्या बहिणीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! विश्वासघात करत नाेकराकडून ‘हे’ घाणेरडं कृत्य

बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानबद्दल मोठी बातमी येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्पिताच्या मुंबईतील घरात चोरी झाली आहे. अर्पिताच्या घरातून तिचे हिऱ्याचे झुमके चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

कानातले चोरीला गेल्यानंतर अर्पिता खान (arpita khan) हिने मुंबईतील खार पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. अर्पिताने आपल्या तक्रारीत सांगितले की, ‘त्या घरातून चोरीला गेलेल्या कानातल्यांची किंमत 5 लाख रुपये आहे.’ त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आणि त्याच रात्री आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिताच्या घरातील चोरी तिच्या घरात काम करणाऱ्या नोकराने केली होती, ज्याचे वय 30वर्षे सांगितले जात आहे. अर्पिता खानच्या या नोकराचे नाव संदीप हेगडे आहे. जो मुंबईतील विलेपार्ले भागातील रहिवासी आहे.

अर्पिता खानबद्दल सांगायचे झाले तर, अर्पिता ही सलमान खानची सख्खी बहीण नसून सलमानचे वडील सलीम खान यांनी तिला दत्तक घेतले आहे. मात्र, कुटुंबातील सदस्य तिला नातेवाईकांपेक्षा जास्त प्रेम देतात आणि सलमान देखील तिच्यावर खूप प्रेम करतो. अभिनेता त्याच्या बहिणीची प्रत्येक इच्छा क्षणार्धात पूर्ण करतो.

अर्पिता खानने अभिनेता आयुष शर्मासोबत लग्न केले आहे. दोघेही दोन मुलांचे पालक आहेत. आयुष शर्मा सध्या बॉलीवूडमध्ये करिअर करण्याच्या प्रयत्नात आहे. तो अखेरचा सलमान खानसोबत ‘अंतिम’ चित्रपटात दिसला होता.(Bollywood salman khan sister arpita khan diamond earrings worth rs 5 lakh stolen from her house)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

छान किती दिसते फुलपाखरू! प्रिया बापटचं लेटेस्ट फाेटाेशूट चर्चेत
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये साराने केला डेब्यू, रेड कार्पेटवर ब्राइडल लूकमध्ये दिसली अभिनेत्री

हे देखील वाचा