Saturday, June 29, 2024

सलमान खाननंतर ऋतिक रोशनसोबत झळकणार शहनाज गिल, व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा

हिंदी सिने जगतात तसेच छोट्या पडद्यावर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. या यादीत अभिनेत्री शहनाज गिलचे (Shehnaaz Gill) नाव प्रामुख्याने घेतले जाते. पंजाबची कॅटरिना कैफ म्हणून लोकप्रिय असलेली शहनाज गिलने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्याचबरोबर काही दिवसांपासून शहनाज गिल सलमान खानसोबत कभी ईद कभी दिवाली या चित्रपटातून पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यानंतर शहनाज गिल अभिनेता ह्रतिक रोशनसोबतही चित्रपटात झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सलमान खान स्टारर ‘कभी ईद कभी दिवाली’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी शहनाज गिल सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटात दमदार  पदार्पण करण्यासाठी ती खूप उत्सुक आहे. त्याचबरोबर अभिनेत्री शहनाज गिल आगामी काळात अभिनेता हृतिक रोशनसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.  शहनाजने आपल्या इंस्टाग्रामवर हृतिकचा एक व्हिडिओ शेअर केल्यावर या चर्चांना सुरुवात झाली आणि त्यासोबत तिने एक उत्तम कॅप्शनही लिहिला आहे जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अलीकडेच हृतिक एका बिअर जाहिरात व्हिडिओमध्ये बियर्ड लूकमध्ये दिसला होता, ज्याचा व्हिडिओ त्याने  त्याच्या सोशल अकाउंटवर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये तो दाट दाढीने दिसत होता. मोनोक्रोमॅटिक एंडोर्समेंट व्हिडिओमध्ये तो कॅज्युअल आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होता. त्याने आपल्या लूकने सर्वांची मनं जिंकली. तिचा हा लूक पाहून शहनाजचेही हा  व्हिडिओ तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

शहनाज गिलने इंस्टाग्रामवर हृतिक रोशनचा हा फोटो शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. यासाठी तिने दिलजीत दोसांझच्या प्रसिद्ध गाण्याच्या “वाइब” च्या ओळीला कॅप्शन दिले आणि लिहिले, ‘विबे तेरी मेरी मिल दिया. शहनाजचे हे कॅप्शन पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी अंदाज लावला की या जाहिरातीत एकतर शहनाज हृतिकसोबत आहे किंवा दोघेही लवकरच स्क्रीन शेअर करू शकतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे कसलं ते दुर्देव! अभिनेता ऋतिक रोशनने ज्या चित्रपटांची ऑफर धुडकावली तेच ठरलेत सुपरहीट
हॅपी बर्थडे कल्की! अनुराग कश्यपसोबत ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडच्या मुलीला दिला जन्म, वाचा अभिनेत्रीबद्दल

हे देखील वाचा