टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याला शुक्रवारी (दि. 11नाेव्हेंबर)ला जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून जिम करत असताना हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला आहे. राजू श्रीवास्तव, सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह अनेक कलाकारांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. 46 वर्षीय अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांच्या निधनाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav)
अभिनेता आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्टला जिममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते ट्रेडमिलवर पडले. यानंतर राजूला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे 41 दिवसांच्या उपचारानंतर 21 सप्टेंबरला राजू श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला.
सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे गेल्या वर्षी 1 सप्टेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अवघ्या 40 व्या वर्षी फिट दिसणाऱ्या सिद्धार्थला जिम करत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला तातडीने कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सिद्धार्थ शुक्ला यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला.
सोनाली फोगट (Sonali Phogat)
टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 42 वर्षीय सोनालीला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी ऐकून तिच्या चाहत्यांनाही धक्काच बसला. सोशल मीडिया स्टार सोनाली फोगट खूप तंदुरुस्त होती आणि ती नियमित व्यायाम करत असे.
सिद्धांत वीर सूर्यवंशी (Siddhaanth Vir Surryavanshi )
अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचे शुक्रवारी (दि. 10 नाेव्हेंबर)ला निधन झाले. जिममध्ये वर्कआऊट करत असताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले.(bollywood sonali phogat sidharth shukla raju shrivastav deepesh bhan and siddhaanth vir surryavanshi actors who got heart attack in the gym and died)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटाने साजरा केला मुलगा जय आणि मुलगी जियाचा पहिला वाढदिवस, पाहा फाेटाे
‘ब्रेथ: इनटू द शॅडोज’च्या टीकेवर अभिषेकने तोडले मौन; म्हणाला,’मानसिक आरोग्याबाबत आम्ही…’