या अभिनेत्यांनी खोटे सिक्स पॅक वापरून केलंय चित्रपटात काम; मात्र प्रेक्षकांना हे समजताच करावा लागला ट्रोलिंगचा सामना


बॉलिवूड चित्रपटांत आज-काल टेक्निकल गोष्टीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक सीन्स डिजिटली बनवले जातात. डिजिटल चित्रपट बनवण्यासाठी विविध टेक्निकचा वापर केला जातो. कधीकधी टेक्निकलचा वापर जास्त प्रमाणात झाल्यामुळे चित्रपट फ्लॉप होण्याची शक्यता असते, तर काही वेळा चित्रपटातील कलाकार हास्याचा विषय बनतात आणि सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होतात.

वीएफएक्सच्या मार्फत सायन्स फिक्शनद्वारे पौराणिक चित्रपट अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवण्यात येतात. तर काही चित्रपटांत वापरण्यात आलेल्या टेक्निक्स दर्शकांना आवडत नाही. काही चित्रपटांत अभिनेत्यांनी आपले सिक्स पॅक दाखवण्यासाठी डिजिटल टेक्निकचा वापर केला आहे व ते दर्शकांना समजले देखील आहे.

गोविंदा- हॅपी एंडिंग
गोविंदा नेहमीच आपल्या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवतो. त्याच्या चित्रपटात प्रेक्षकांना मनोरंजनाची पूर्ण खात्री देखील असते. अभिनयाच्या कौशल्याने त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. मात्र ‘हॅपी एंडिंग’ चित्रपटामुळे त्याच्या प्रतिमेचे खूप नुकसान झाले. सेक्सी फिल्म करणे सिक्स पॅक दाखवण्यासाठी डिजिटल टेक्निकचा वापर करण्यात आला. मात्र प्रेक्षकांनी त्याचे नकली सिक्स पॅक ओळखले. (bollywood stars who deceived the audience with cgi technology)

सलमान खान- दबंग-३, वॉन्टेड, एक था टायगर
बॉलिवुडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान, तो तर आपल्या बॉडीवर पूर्ण लक्ष देतो. सलमान खानच्या बऱ्याच चित्रपटांत नकली सिक्स पॅक दाखवण्यात आले आहेत. ‘दबंग-३’मध्ये डिजिटल टेक्निकचा वापर करून नकली सिक्स पॅक दाखवण्यात आले. त्यामुळे संपूर्ण सोशल मीडियावर त्याची बरीच मजा घेण्यात आली. ‘वॉन्टेड’मध्ये देखील त्याची बॉडी दाखविण्यासाठी डिजिटल टेक्निक्स वापरल्या होत्या. शिवाय ‘एक था टायगर’मध्ये ही नकली सिक्स पॅक दाखवण्यात आले होते. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले होते.

अक्षय कुमार- बॉस

तसे पाहायला गेले तर अक्षय कुमार आपल्या अभिनयासाठी सरस व सगळ्यात फिट अभिनेता मानला जातो. तरीदेखील त्याच्या ‘बॉस’ या चित्रपटासाठी खोटे सिक्स पॅक दाखवण्यात आले होते. मात्र ते खोटे सिक्स पॅक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाहीत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रूद्र’ वेबसीरिजमधून अजय देवगण करणार ओटीटीवर पदार्पण; म्हणाला, ‘वाद चालूच असतात आणि…’

-जेव्हा ६४ वर्षीय ‘बिग बीं’नी १९ वर्षाच्या अभिनेत्रीसोबत केलं होतं लिप-लॉक, चाहत्यांमध्ये पसरली होती तीव्र नाराजी

-जेव्हा श्रॉफ परिवार जगायचे हलाखीचे जीवन; घरातील मूलभूत सामान विकून करावा लागला होता उदरनिर्वाह….


Leave A Reply

Your email address will not be published.