Sunday, March 23, 2025
Home बॉलीवूड ‘डिस्को डान्सर’ मिथुन यांचा मायकल जॅक्सनच्या अंदाजात भन्नाट डान्स, थ्रोबॅक व्हिडिओला चाहत्यांची पसंती

‘डिस्को डान्सर’ मिथुन यांचा मायकल जॅक्सनच्या अंदाजात भन्नाट डान्स, थ्रोबॅक व्हिडिओला चाहत्यांची पसंती

बॉलिवूडचा ‘डिस्को डान्सर’ म्हणून अभिनेेते मिथुन चक्रवर्ती यांना ओळखले जाते. त्यांनी आपल्या अनेक चित्रपटातून आणि त्यांच्या डान्स शैलीतून सगळ्यांचे मन जिंकले आहे. आधीसारखे ते आता चित्रपटांमध्ये दिसत नाहीत. परंतु सोशल मीडियावर मात्र ते मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसत आहे. 80-90 च्या दशकात त्यांच्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लागले होते. आजही त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. मिथुन यांचा असाच एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये त्यांनी मायकल जॅक्सनच्या अंदाजात डान्स केला आहे.

मिथुन चक्रवर्ती यांचा हा व्हिडिओ त्या वेळेसचा आहे, जेव्हा ते सोनी टीव्हीवरील ‘एंटरटेनमेंट के लिये कुछ भी’ या शोच्या सेटवर गेले होते. ते यादरम्याान 90 वर्षांचे वृद्ध व्यक्ती बनून सेटवर गेले होते. त्यांनी मायकल जॅक्सनच्या अंदाजात या मंचावर डान्स केला होता.

त्यांचा हा या डान्स बघून या शोचे जज ‘फराह खान’ आणि आणि अनू मलिक देखील हैराण झाले होते. नंतर या गोष्टीचा खुलासा झाला की, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मिथुन चक्रवर्ती हे आहेत. त्यानंतर पूर्ण शोमध्ये त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले गेले.

मिथुन चक्रवर्ती यांच्या या व्हिडिओला यूट्यूबवर पोस्ट करण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 21 लाखांपेक्षाही जास्त वेळा बघितले गेले आहे.

त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ते शेवटचे ‘द ताशकंद’ या चित्रपटात दिसले होते. माध्ममांना मिळालेल्या महिनीनुसार ते एका चित्रपटाचे दोन ते अडीच करोड एवढे रुपये घेतात. मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या करिअरमध्ये बॉलिवूडमधील 350 पेक्षाही जास्त चित्रपटानमध्ये काम केले आहे. याव्यतिरिक्त ते रविवारी (७ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात सामील झाले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-मुंबईचा ‘डॅडी’ बनणार आजोबा! मुलीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडिओ व्हायरल

-जस्टीन बीबरच्या एक्स गर्लफ्रेंडचं नवीन गाणं रिलीझ, ३ दिवसात मिळाले ४५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-बंदूक घेऊन सपना चौधरी बनली ‘गुंडी’, गाण्याचा टिझर रिलीझ

हे देखील वाचा