ब्रेकिंग.! दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे धाकटे बंधू राजीव कपूर कालवश, सिनेसृष्टीवर शोककळा

बॉलिवूडचे अभिनेते व निर्माते राजीव कपूर यांचे निधन झाले आहे. आज (9 फेब्रुवारी) हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. राजीव कपूर हे राज कपूर यांचा मुलगा होता. ते 58 वर्षांचे होते. राजीव कपूर हे रणधीर कपूर, ऋषी कपूर यांच्यात सर्वात धाकटे होते.

माध्यमातील वृत्तानुसार, राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर भाऊ रणधीर कपूर त्यांना चेंबूरच्या इनलेक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

माध्यमातील वृत्तानुसार, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रणधीर कपूरने भावाच्या मृत्यूची पुष्टी केली आणि म्हटले की, ‘मी माझा सर्वात लहान भाऊ राजीव आज गमावला. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण ते त्याला वाचवू शकले नाहीत.’

रणधीर कपूर पुढे म्हणाले, ‘मी आता रुग्णालयात आहे, आणि त्याच्या शरीराची वाट पाहात आहे’.

राजीव कपूर ‘राम तेरी गंगा मैली’ (1985) आणि ‘एक जान हैं हम’ (1983) मधील अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. ऋषी कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘प्रेमग्रंथ’चे ते दिग्दर्शक देखील होते. नीतू कपूर, राजीव कपूर यांची मेव्हणी यांनी इंस्टाग्रामवर शोक व्यक्त केला. तसेच अन्य कलाकारांनी देखील ट्विटरवर त्यांना श्रद्धांजली दिली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

द लेजेंड हनुमान  सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?
तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतंय स्पेलंडर  गाणं, रिलीज झाल्यापासून चार दिवसांत मिळालेत लाखो हिट्स
गुरु रंधावाच्या या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; हिट्स लाखोंच्या घरात
प्रीती झिंटाच्या  बुमरो बुमरो  गाण्यावर काश्मिरमध्येच थिरकली शहनाज गिल, व्हिडीओने सोशल मीडियावर मिळविल्या लाखो हिट्स

Leave A Reply

Your email address will not be published.