पंजाबचा प्रसिद्ध गायक सतबीर अहूजा याचे नवीन पंजाबी गाणे ‘स्पेलंडर’ प्रदर्शित झाले आहे. हे गाणे स्वतः सतबीरने गायिले, लिहिले आणि कम्पोज देखील केले असून गाण्याला संगीत शैरी नेक्ससने दिले आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच व्हायरल झाले असून, प्रेक्षकांकडून या गाण्याला प्रचंड लाइक्स आणि व्हिव्ज मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वी हे गाणे फक्त ऑडिओ रूपात प्रदर्शित झाले होते, मात्र आता या गाण्याला ऑडिओ आणि व्हिडिओ या दोन्ही स्वरूपात प्रदर्शित केले गेले आहेत. सोशल मीडियावर सतबीरला त्यांचे फॅन्स मागील अनेक दिवसांपासून या गाण्याच्या व्हिडिओ व्हर्जनची मागणी करत होते. यासाठी त्याला फॅन्स कमेंट्स आणि मेसेजेस देखील करत होते. अखेर ५ फेब्रुवारीला सतबीरने या गाण्याचे व्हिडिओ व्हर्जन देखील प्रदर्शित केले आहे.
ह्या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर दोनच दिवसात यूट्यूबच्या ट्रेण्डिंग यादीत टॉपवर पोहोचला आहे. या गाण्याच्या ऑडिओ व्हर्जनला प्रेक्षकांनी खूपच प्रतिसाद दिला होता. आता या गाण्याच्या व्हिडिओ व्हर्जनला ऑडिओ पेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे.
या गाण्याला आतापर्यंत ४६ लाख व्हिव्ज मिळाले असून हे गाणे तरुणांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय ठरत आहे.
हेही वाचा-
प्रपोज करायचंय? मग बॉलिवूड कलाकारांनी केलेल्या ‘या’ आयडिया एकदा वापरून तर पाहा