‘द लेजेंड हनुमान’ सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?


डिज्नी प्लस हॉटस्टार लवकरच लहान मुलांसाठी पवनपुत्र हनुमानाची शौर्यगाथा सांगणारी ‘द लेजेंड हनुमान’ सिरीज घेऊन येत आहे. ही एक अँनिमेशन मालिका असणार आहे. ‘द लेजेंड हनुमान’ ही सिरीज २९ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरला लोकांनाच जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या सिरीजचे खास आकर्षण म्हणजे या सिरिजला शरद केळकरने त्याचा आवाज दिला आहे.

या संपूर्ण सिरीजमध्ये शरद त्याच्या आवाजात हनुमानाची कथा आपल्याला सांगणार आहे. ही सिरीज इतर हनुमानाच्या मालिकांपेक्षा किंवा गोष्टींपेक्षा कशी वेगळी आहे याबद्दल शरदने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘तसे पहिले तर आपल्या सर्वाना हनुमानाच्या कथा माहित आहे. त्या कथा ऐकत आणि बघतच आपण मोठे झाले आहोत. मात्र आपण खूप कमी ऐकले किंवा पहिले असेल की, हनुमानाच्या सर्व शक्ती नाहीशा झाल्या होत्या, त्याला तो एक सामान्य वानर आहे असेच वाटत होते. त्यानंतर त्याला कसे समजले की तो एका अद्भुत वानर आहे, त्याच्या शक्ती का गेल्या होत्या, त्या पुन्हा कशा आल्या आदी अनेक नवीन आणि रोचक कथा या सfरीजमधून आपल्याला ऐकायला मिळणार आहेत.’

पुढे बोलताना शरद म्हणाला, ‘मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला एका सूत्रधाराच्या भूमिकेतून ह्या गोष्टी सांगता येणार आहेत. मला असे वाटते की ही गोष्ट लोकांना विश्वासाच्या दिशेने घेऊन जाईल, आणि सोबतच ही शिकवण येईल की, अस्तित्वाचे महत्व शक्तीमध्ये नसले तरी विश्वास, साहस आणि उदरतामध्ये आहे.’

या मालिकेचे दिग्दर्शन जीवन जे कांग आणि नवीन जॉन ने यांनी केले आहेत. तर या मालिकेचे मुख्य लेखन शरद देवराजन, सरवत चड्ढा, अश्विन पांडे आणि अर्शद सैयद यांनी केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.