Thursday, April 18, 2024

भारीच ना! हिंदीमधील ‘या’ सुपरहिट चित्रपटांचे साऊथमध्येही बनलेत रिमेक, पाहा संपूर्ण लिस्ट

सिनेसृष्टीमध्ये बॉलिवूडला टक्कर देण्यासाठी टॉलिवूड देखील आता सज्ज झाले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे वेड फक्त तेथील नागरिकांनाच नाही, तर हिंदी भाषिक नागरिकांना देखील आहे. या चित्रपटांच्या कहाण्या त्यातील पात्र आणि कलाकार चित्रपट यशस्वी होण्यासाठी आपल्या अभिनयाला पूर्ण न्याय देतात. त्यामुळेच आज टॉलिवूडने यशाच्या शिखराला गवसणी घातली आहे. सध्या बॉलिवूडमध्ये टॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे रिमेक केले जातात. अनेक रसिक प्रेक्षकांची अशी खास मागणी असते. हिंदी भाषिक चित्रपट देखील टॉलिवूडमध्ये रिमेक करून साकारले जातात. आज अशाच काही बॉलिवूडमधील चित्रपटांचे टॉलिवूडमध्ये असलेले रिमेक जाणून घेऊ.

थ्री इडिएट्स
‘थ्री इडिएट्स’ चित्रपटाने लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर राज्य केले. यामध्ये दाखवण्यात आलेले विलक्षणीय प्रयोग, मैत्रीचे प्रेम या सर्व गोष्टी प्रेक्षकांना खूप भावल्या या चित्रपटामध्ये विज्ञानाला दिलेले महत्व खूप छान पद्धतीने मांडण्यात आले. चित्रपटामध्ये आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी या कलाकारांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडली. साल २००९ मध्ये आलेल्या या चित्रपटाचा साल २०१२ मध्ये तमिळ भाषेत रिमेक बनवला गेला. ‘ननबन’ या चित्रपटामध्ये श्रीकांत, जीवा, विजय आणि इलियाना डिक्रूज हे कलाकार आहेत.

बँड बाजा बारात
लग्न समारंभांमध्ये होत असलेला कामांचा घोळ, इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायिकांची लूट ‘बँड बाजा बारात’ चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. यामध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेमध्ये आहेत. रणवीरने या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल टाकले. चित्रपट प्रदर्शित झाल्यांनतर चार वर्षांनी या चित्रपटाचा तमिळ भाषेत रिमेक बनवण्यात आला. साल २०१४ तमिळ भाषिक ‘आहा कल्याडणम’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी खूप पसंती दिली.

विक्की डोनर
बॉलिवूडचा हिट चित्रपट ‘विक्की डोनर’चा देखील साऊथमध्ये रिमेक बनवण्यात आला आहे. साल २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना आणि यामी गौतम यांनी दमदार अभिनय केला होता. या दोन्ही कलाकारांचा बॉलिवूडमधील हा प्रथम चित्रपट होता. साल २०२० मध्ये याचा तमिळमध्ये रिमेक बनवला गेला. त्या चित्रपटाचे नाव ‘धराला प्रभु’ हे आहे. या चित्रपटामध्ये हरेश कुमार आणि तान्या होपे मुख्य भूमिकेमध्ये झळकले.

पिंक
साल २०१६ मध्ये आलेला चित्रपट ‘पिंक’मध्ये तापसी पन्नूने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. तिच्यासह बिग बी देखील या चित्रपटामध्ये झळकले होते. यामध्ये तापसीने आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला. या चित्रपटाचा तमिळ रिमेक ‘नेरकोंडा परवाई’ साल २०१९ मध्ये आला होता. हिंदी चित्रपटातील तापसीच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले. तिच्या या चित्रपटाला रसिक प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली.

तुम्हारी सुलू
साल २०१७ मध्ये विद्या बालनचा तुम्हारी सुलू चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करू शकला नाही, पण चित्रपटाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. चित्रपटामध्ये विद्या बालनसह नेहा धूपिया आणि मानव कौल हे कलाकार देखील महत्वाचे पात्र साकारत होते. साल २०१८ मध्ये या चित्रपटाचा तमिळ रिमेक ‘कातरिन मोजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटासह विद्याच्या ‘कहाणी’ चित्रपटाचा देखील टॉलिवूडमध्ये रिमेक आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

श्रीदेवी यांच्या हिट गाण्यावर जबरदस्त नाचली पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान

मंसूर अली खान पतौडींच्या पुण्यतिथी दिनी सोहा अली खान शर्मिला टागोर यांनी घेतले त्यांच्या कब्रचे दर्शन

फॅन्सला पुन्हा झाला बिग बॉस फेम सोनाली फोगट यांच्या जबरदस्त डान्सचा ‘दिदार’

हे देखील वाचा