Saturday, September 30, 2023

तब्बल २५ खोल्यांच्या बंगल्यात राहणाऱ्या ‘या’ अभिनेत्याने केवळ एका चुकीमुळे बाकीचे आयुष्य घालवले चाळीत

अनुराग बासूचा (Anurag Basu) २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लुडो’ चित्रपटात वापरलेले ‘ओ बेटा जी’ हे गाणे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. प्रत्येकाच्या ओठावर हेच गाणे होते. हे गाणे ऐकल्यानंतर चाहत्यांनी युट्यूबवर त्याचे मूळ व्हर्जन शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा चाहत्यांना कळले की, हे ‘अलबेला’ चित्रपटाचे गाणे आहे, ज्यात भगवान दादा (Bhagwan Dada) नावाच्या अभिनेत्याने काम केले होते. चला तर मग भगवान दादा यांच्याबद्दल असे काही जाणून घेऊया, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

खरं तर, भगवान दादा हे त्यांच्या काळातील एक मोठे स्टार होते. त्यांचे खरे नाव भगवान आबाजी पालव होते. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्याला खूप वाईट टप्प्यातून जावे लागले होते. घर चालवण्यासाठी त्यांना मोलमजुरी करावी लागली. पण काळाचं चाक फिरलं आणि ते कॉमेडीचा नटलेला बादशहा बनले.

भगवान दादा राहत होते २५ खोल्यांच्या बंगल्यात
भगवान दादा यांच्या छंदाबद्दल अनेक प्रसिद्ध कथा आहेत. असे म्हटले जाते की, स्टार बनल्यानंतर ते २५ खोल्यांच्या घरात राहायचे. जुहू येथे त्यांचा बंगला होता. इतकंच नाही, तर त्यांना महागड्या गाड्यांचाही शौक होता. माध्यमांतील वृत्तानुसार, त्यांच्याकडे १-२ नव्हे तर ७ गाड्या होत्या. ते रोज गाड्या बदलून कामावर जायचे. अभिनेत्याच्या आयुष्यातही सर्व काही ठीक चालले होते. पण नशिबाच्या मनात काही वेगळेच होते कोणाला माहित होते. कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्यांनी अशी चूक केली की, ते खाली आले.

एका चुकीमुळे बदलले आयुष्य
भगवान दादा यांनी आपली संपूर्ण ठेव गुंतवून चित्रपट निर्मितीला सुरुवात केली. या चित्रपटाचे नाव ‘हसते रहाना’ होते. या चित्रपटासाठी मुख्य अभिनेता म्हणून किशोर कुमार यांची निवड करण्यात आली होती. या चित्रपटात किशोर कुमार यांना साईन करणे ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असे मानले जाते.

बाकीचे आयुष्य घालवले चाळीत
हा चित्रपट कधीच पूर्ण होऊ शकला नाही आणि भगवान दादांना खूप त्रास सहन करावा लागला. एवढ्या मोठ्या आर्थिक नुकसानीनंतर त्यांना आपले जीवन गरिबीत काढावे लागले. त्यांना बंगला सोडून चाळीत राहावे लागले. या धक्क्यातून ते कधीच बाहेर पडू शकले नाहीत आणि याच चाळीत त्यांचा मृत्यू झाला.

अधिक वाचा- 
विनोदाचे राजे ‘भगवान दादा’! शूटिंगदरम्यान मारली होती अभिनेत्रीला चापट; फाटली होती डोळ्याची शीर
काळीज तोडणारी बातमी! शाहरुखच्या सर्वात मोठ्या चाहत्याचे निधन, लगेच वाचा

हे देखील वाचा