Friday, July 5, 2024

ऐश्वर्याला किसिंग सीनबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अभिषेकने दिले जबरदस्त उत्तर, किस करत म्हणाला ‘पाश्चात्य…’

काही वर्षांपूर्वी ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा पती अभिषेक बच्चन ओप्रा विन्फ्रे शोमध्ये पोहोचले होते. 2007 मध्ये लग्न झाल्यानंतर, ते प्रथमच मुलाखतीत दिसले होते. त्यांच्या फिल्मी करिअर आणि नात्याबद्दल ओप्राने त्यांना प्रश्न विचारले. त्यावेळी या मुलाखतीबद्दल बरीच चर्चा झाली होती. विशेष म्हणजे मुलाखती दरम्यान ऐश्वर्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अभिषेकने दिले होते. आता त्यांची ही मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे.

वास्तविक, शोमध्ये ओप्राने ऐश्वर्याला विचारले होते की, बॉलिवूडमध्ये चमकदार कारकीर्द असूनही तिने कधीही कॅमेरासमोर किसिंग सीन दिला नाही. ओप्रा असे म्हणताना दिसली, “मला वाटते की तुम्ही कधी कॅमेर्‍यावर किसिंग सीन दिला नाही.” ऐश्वर्या त्यांच्या प्रश्नावर फक्त हसली आणि अभिषेक बच्चन म्हणाला की, “बेबी पुढे हो.” ऐश्वर्याने काही म्हणण्याच्या आधीच अभिषेकने तिच्या गालावर किस केले आणि ओप्राला म्हणाला, “पाश्चात्य चित्रपटांमध्ये जसे उघडपणे सर्वकाही दाखवतात, तसे भारतात होत नाही.”

अभिषेक पुढे म्हणाला, “प्रश्न हा नाही की, या गोष्टी स्वीकारल्या जातील की नाही, पण आम्हाला याची गरज वाटत नाही. तुम्ही असं समजा. जेव्हा आपण एखादा सीन करतो, तेव्हा मुले मुलींना भेटतात, एकमेकांना ते आवडतात, त्यांना प्रेम होते, मग प्रेम व्यक्त करण्यासाठी ते काय करतात. भारतात ते व्यक्त करण्यासाठी गाणे दाखवले जाते. त्यात हे सर्व जिव्हाळ्याचे क्षण दाखवले जातात.”

ऐश्वर्या त्याच्या आयुष्यात कशी आली, हेही अभिषेकने सांगितले होते. तो म्हणाला, “मी न्यूयॉर्कमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये होतो. हॉटेलच्या बाल्कनीत उभे राहून, आमच्या दोघांचे लग्न व्हावे, अशी मी प्रार्थना करायचो. मी ऐश्वर्याला एक दिवस त्याच बाल्कनीत घेऊन गेलो आणि तिला लग्नासाठी प्रपोज केलं.”

यावर ऐश्वर्या म्हणाली की, अभिषेकची ही प्रपोज करण्याची पद्धत खूपच गोड होती आणि तीच तिला खूप आवडली. याव्यतिरिक्त, प्रियांका चोप्राची ओप्रा विन्फ्रेसोबतची मुलाखतही काही दिवसांपासून चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिलजीतने शेअर केला मुलासोबतचा मजेशीर व्हिडिओ, सेलेब्सनी विचारले ‘आई कुठे आहे?’

-मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!

-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा

हे देखील वाचा