करीना कपूर खान अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. अशातच करीना पुन्हा एकदा तिच्या इगाेमुळे ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे. खरं तर, करीना कपूर खान विमानतळावर दिसली होती, जिथे एक चाहती तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तिच्या मागे धावताना दिसली. मात्र, करीनाने तिच्या फॅनकडे अशा प्रकारे दुर्लक्ष केले की, जसे तिच्या मागे कुणीच नाही.
खरेतर ग्रँड प्रिक्स इवेंटमध्ये सहभागी होण्यासाठी करीना मोनॅकोला गेली होती, जिथून परतत असताना ती मुंबई विमानतळावर दिसली. यादरम्यान तिच्या एका फॅनने तिला सेल्फी घेण्यास सांगितले, पण करीनाने तिच्या फॅनकडे बघितले नाही आणि सरळ चालत राहिली, ज्यानंतर तिच्या बाॅडी गार्डने फॅनला हातवारे करून करीनापासून दूर राहण्यास सांगितले आणि ती निघून गेली. करीनाची ही वागणुक पाहून साेशल मीडिया युजर्स अभिनेत्रीवर प्रचंड नाराज झाले आहेत आणि अभिनेत्रीला ट्राेल करत आहेत.
चाहत्यांनी केले करीनाला ट्रोल
करीनाच्या या वागणुकीला विरोध करत एका युजरने लिहिले की, “अरे! हे खूप वाईट आहे, ती खूप उद्धटपणे वागते… फॅनला तिच्यासाेबत फक्त सेल्फी घ्यायची हाेती. मला समजत नाही की, या बॉलीवूड अभिनेत्रींना एवढा इगाे कशाचा आहे. म्हणूनच मला ती कधीच आवडत नाही, ती फक्त चित्रपटांमध्ये प्रेमळ वागते, नाहीतर वास्तव बघा…”
View this post on Instagram
करीनाच्या एअरपोर्ट लूकबद्दल बोलायचे झाले, तर यावेळी ती व्हाईट रंगाच्या हुडी ट्रॅक सूटमध्ये दिसली. व्हाईट स्नीकर्स आणि ब्लॅक सनग्लासेससह अभिनेत्रीने तिचा लूक पुर्ण केला हाेता. करीनाचा हा लूक खूप छान दिसत होता, पण तिच्या इगाेमुळे चाहत्यांना खूप निराश केले.(bollywoodd actress kareena kapoor khan ignored fan came for selfie actress get trolled on social media )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्याचे लिव्हरच्या गंभीर आजाराने निधन, उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव होती चालू
माेठी बातमी! कार्यक्रमाच्या आयाेजकांवर गुन्हा दाखल केल्याबाबत गाैतमी पाटीलचं माेठं वक्तव्य म्हणाली,’माझा दोष…’