Tuesday, July 1, 2025
Home बॉलीवूड भारतीय सैन्याचा नादच खुळा! बॉम्बवर रवीनाचे नाव लिहीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेट देण्याचा केलेला प्लॅन

भारतीय सैन्याचा नादच खुळा! बॉम्बवर रवीनाचे नाव लिहीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेट देण्याचा केलेला प्लॅन

मागील वर्षी स्वातंत्रदिनाच्या दोन दिवस आधी देशभक्तीवर आधारित ‘शेहशाह’ हा सिनेमा रिलीझ झाला होता. या सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे दोघे मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाची कहाणी कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमातील एक किस्सा चांगलाच चर्चेत होता, ज्यामध्ये एका पाकिस्तानी सैनिकाने विक्रम यांना सांगितलं होतं की, “माधुरी दीक्षित आम्हाला द्या, आम्ही येथून निघून जातो.” पण याला विक्रम बत्रांनी आपल्याच अंदाजात सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं.

पाकिस्तानी जेव्हा माधुरी दीक्षितबाबत बोलला, तेव्हा विक्रम बत्रा यांनी त्याला गोळी मारली होती. त्यावेळी ते म्हणाले होते, ​”माधुरी दीक्षित तर सध्या दुसऱ्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, पण आता यावरच काम चालवून घ्या.” ज्याप्रकारे माधुरीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता, तसाच काहीसा उल्लेख हा अभिनेत्री रवीना टंडन हिच्या नावाचाही करण्यात आला होता. तो पण थेट रॉकेटवर. हा उल्लेख भारतीय सैनिकांकडून थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानांसाठी करण्यात आला होता. काय होता तो किस्सा चला जाणून घेऊया.

दिनांक १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन दिवस प्रत्येक भारतीयांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे दिवस. कारण या दिवसाला खूप महत्त्व आहे. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला होता, तर २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. जेव्हाही हे दोन दिवस येतात, तेव्हा सोशल मीडियावर एका बॉम्बचा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होऊ लागतो. हा कोणताही साधा-सुधा बॉम्ब मुळीच नाहीये. भारताच्या काही सैनिकांनी केलेल्या या कामाचा हा नमूना आहे. कारण, या बॉम्बवर लिहिलं होतं. ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यानं सर्वांना भुरळ घालणाऱ्या रवीना टंडनचं नाव.

असं सांगितलं जातं की, कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानी फौजा, भारतीय सैनिकांची थट्टा उडवायचे. आपण आधी बोलल्याप्रमाणे चेष्टा- मस्करीत ते म्हणायचे की, आम्हाला माधुरी दीक्षित द्या, आणि काश्मीर तुम्हालाच घ्या. पण याचा दणका त्यांना चांगलाच बसला होता. असंच एकदा भारत दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी रवीना टंडनला आपली आवडती अभिनेत्री सांगितलं होतं. आता थट्ट मस्करी करणं फक्त पाकिस्तानी सैनिकांनाच जमतं असं मुळीच नाही. भारतीय सैनिकांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. भारताच्या काही सैनिकांनी मिळून पाकिस्तानी पंतप्रधानांना बॉम्ब गिफ्ट करण्याचा प्लॅन बनवला. त्या हिरव्या रंगाच्या बॉम्बवर लिहिलं होतं की, “From Raveena Tandon To Nawaz Sharif.” यावर खडूने पांढऱ्या रंगाचा लव्ह इमोजी आणि त्याला भेदून जाणारा एक बाण बनवला होता.

हा बॉम्ब पाकिस्तानच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचला की नाही. याबाबत तर काही माहिती नाही, पण आपल्याकडं वर्षात दोनदा तरी याची चर्चा होतेच होते. आता या प्रकरणावर अभिनेत्री रवीना टंडननेही चर्चा केलीये. मीडियाशी बोलताना ती म्हणाली की, “मी ते खूप नंतर पाहिलं. पण तरीही माझा संपूर्ण जगाला सल्ला असेल की, जे प्रश्न प्रेम आणि संवादाने सोडवता येतात, ते त्याच पद्धतीनं सोडवा. रक्ताचा रंग इकडेही लाल आणि तिकडेही लालच आहे. जर एखाद्या आईने आपला मुलगा किंवा मुलगी गमावली, तर कोणालाही त्याचा गर्व झाला नाही पाहिजे. माझ्या देशाच्या सुरक्षेसाठी मला तिथं उभं राहावं लागलं, तर माझ्या हातात बंदूक द्या, मी तिथं उभी राहील.”

रवीना जे काही म्हणाली, ते तर योग्यच आहे. पण ती जे काही म्हणाली, त्यावरून स्पष्ट होतं की, तिला असं काहीही म्हणायचं नव्हतं, जे चुकीच्या पद्धतीने घेतलं जाईल. किंवा त्यावर वादाला तोंड फुटेल. तिची ही प्रतिक्रिया बरोबरही आहे. कारण, भारतात एखाद्याचे बोल कधी, कुठे आणि कुणाच्या मनाला लागतील. काही सांगता येत नाही. आणि मग त्यानंतर कोर्टाच्या चकरा आणि सतरा प्रकारच्या वादांचा सामना कोण करेल, पण रवीनाच्या या वक्तव्याने सर्वांनाच गार केलं होतं.

रवीनाबद्दल सांगायचं झालं, तर बराच काळ रुपेरी पडद्यापासून दूर असणारी ही अभिनेत्री ‘आरण्यक’ नावाच्या वेबसीरिजमध्ये झळकलेली. नेटफ्लिक्सवरील या वेबसीरिजमधून तिनं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं होतं. ती ‘केजीएफ २’ मध्ये झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

पाकिस्तानी क्रिकेटर्सनी लय घासली, पण बॉलिवूड अभिनेत्रींचं प्रेम मिळालंच नाही, एक तर किडनॅप करायला निघालेला

कशी नशिबाने थट्टा मांडली! आलिशान आयुष्य सोडून कलाकार भिकाऱ्याच्या रूपात झाले पब्लिक प्लेसमध्ये स्पॉट

साधीसुधी नव्हती बॉलिवूडमधली ‘ही’ भांडणं, सलमान आणि शाहरुखने खणाखण वाजवलेली कानाखाली

हे देखील वाचा