विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी इंतेझार हुसैन सय्यद यांनी दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयानेही हिरवा सिग्नल दिला आहे. हा चित्रपट आता त्याच्या नियोजित तारखेला म्हणजे ११ मार्च रोजी प्रदर्शित होऊ शकतो.
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाची कथा ९०च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या पलायन आणि त्यांच्या निर्दयी हत्येची आहे. मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, नुपम खेर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक यांसारख्या कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ खूप चर्चेत आहे. नुकतेच जम्मूमध्ये या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यानंतर प्रेक्षकांच्या भावनिक प्रतिक्रिया समोर आल्या. त्यानंतर चाहत्यांनी चित्रपट दिग्दर्शकाला सांगितले की, त्यांनी या चित्रपटाचे प्रमोशन ‘कपिल शर्मा शो’मध्ये करावे, जेणेकरुन हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या या ट्वीटनंतर विवेक अग्निहोत्रीने त्यांना उत्तर दिले, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
विवेक अग्निहोत्री यांनी पुढे लिहिले की, “मी देखील त्याचा चाहता आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, कपिलने आम्हाला त्याच्या शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार दिला आहे. कारण आमच्या चित्रपटात एकही मोठा स्टार नाही. बॉलिवूडमधील नॉनस्टार दिग्दर्शक, लेखक, चांगले अभिनेते यांना कोणी विचारत नाही.” विवेक यांच्या या आरोपांनंतर अनेक युजर्सनी कपिल शर्माची खरडपट्टी काढली आणि त्याला ट्रोल केले.
‘द कश्मीर फाईल्स’मध्ये एकीकडे अनुपम खेर, पुनीत इस्सार आणि मिथुन चक्रवर्तीसारखे ज्येष्ठ अभिनेते आहेत. तर दर्शन कुमारही त्याचा महत्त्वाचा भाग आहे. पल्लवी जोशीनेही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ९० च्या दशकात काश्मीरमध्ये झालेल्या हिंदूंच्या हत्याकांडावर ते बांधले आहे.
हेही वाचा –