आजच्या काळात सोशल मीडिया ही मनुष्याच्या गरजांमधील एक मुख्य गरज बनली आहे. सोशल मीडियावर अगदी लहानातल्या लहान व्यक्तीपासून, मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वच लोकं सोशल मीडियावर सक्रिय आहेत. कलाकारांसाठी तर सोशल मीडिया हे त्यांचे प्रमोशन करण्याचे एक उत्तम माध्यम बनले आहे. स्वतःच्या प्रमोशनसोबतच त्यांच्या सिनेमाचे प्रमोशन देखील यावर केले जाते. त्यामुळे सामान्य लोकांसोबत कलाकार देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांची फॅन फॉलोविंग वाढवत असतात. इंडस्ट्रीमधील अगदी मोजकेच असे कलाकार असतील जे सोशल मीडियावर नसतील. सोशल मीडियावर नसलेल्या कलाकारांपैकी एक असलेले प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांनी देखील दणक्यात इंस्टाग्रामवर एन्ट्री मारली आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि यशस्वी निर्माते असलेले बोनी कपूर यांनी इंस्टाग्रामवर अकाउंट ओपन केले असून, ते आता ट्विटरसोबतच इंस्टाग्रामवर देखील सक्रिय असतील. बोनी कपूर हे इंस्टवर सक्रिय झाल्याचे अर्जुन कपूरने त्याच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. बोनी कपूर यांच्या अकाऊंटचा फोटो शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे.

अर्जुनने या फोटोसोबतच एक नोट देखील लिहिली आहे, “हे देखील झाले. डॅड फायनली त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि जगाला त्यांची फॅशनेबल बाजू दाखवण्यासाठी इंस्टाग्रामवर आले आहेत.” यासोबतच जान्हवी, ख़ुशी, सोनम यांनी बोनी कपूर यांचे इंस्टवर स्वागत केले आहे. बोनी कपूर यांचे अकाऊंट अद्याप व्हेरिफाय झाले नसले तरी २४ तासाच्या आताच त्यांचे ३ हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स झाले आहेत. ३० नोव्हेंबर रोजी तयार केलेल्या या अकाऊंटमध्ये त्यांनी अनेक न बघितलेले फोटो शेअर केले आहेत.
बोनी कपूर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ते लवकरच अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. लव रंजन दिग्दर्शित एका सिनेमात बोनी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या सोबत प्रमुख भूमिकेत दिसतील. या चित्रपटाची संपूर्ण शूटिंग पूर्ण झाली असून, पुढील वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेत्याने उरकून टाकले लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का!