Wednesday, February 21, 2024

नागराज मंजुळेंच्या नवीन चित्रपटाचं चांगभलं! सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात, फोटो शेअर करत दिली माहिती

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी खूप कमी वेळात त्याची चांगली ओळख निर्माण केली आहे. नागराज मंजुळे यांचे लाखो चाहते आहेत. त्याचा मराठी चित्रपट ‘सैराट’ प्रचंड गाजला आहे. नागराज मंजुळे यांना खरी ओळख याच चित्रपटामुळे मिळाली आहे. त्यांनी सिनेसृष्टीत यक्षस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते. नागराज मंजुळे यांचा घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट काही महिन्यांपुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता नागराज मंजुळे यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे. तेपैलवान खाशाबा जाधव (Khasaba) यांच्या आयुष्यावर जीवनपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या संदर्भात पोस्ट नागराज मंजुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकांउटवर शेअर केली आहे. नागराज मंजुळे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नागराज मंजुळे यांनी पोस्ट करताना लिहिले की, “चांगभलं.” तसेच त्यांनी सिनेमाचे शुटिंग सुरू करत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

नागराज मंजुळे यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. कमेंट करताना एकाने लिहिले की, “चांगभलं… वाट पहातोय एका खणखणीत चित्रपटाची…सर्व टीमला शुभेच्छा.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “अभिनंदन. अण्णा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.” तसेच अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

नागराज मंजुळे यांनी काही दिवसांपूर्वी पोस्ट करत लिहिले होते की, “ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पहिलवान खाशाबा जाधवांच्या आयुष्यवर मला चित्रपट करायला मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. फँड्री,सैराट नंतर ‘खाशाबा’ हा माझा तिसरा मराठी चित्रपट असेल जो मी दिग्दर्शित करतोय.जिओ स्टुडिओ, ज्योती देशपांडेंसोबत ही माझी पहिलीच फिल्म आहे.निखिल साने सर फँड्री पासून सोबत आहेतच. हा प्रवास नक्कीच रंजक आणि संस्मरणीय असेल…” त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. (Nagraj Manjule shared the poster of the movie Khasaba and gave great information)

आधिक वाचा-
काजोलने शाहरुख, आमिर आणि अक्षय कुमारचे ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट नाकारले, अभिनेत्रीने केला खुलासा
रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये रणवीर सन्मानित, जॉनी डेपला मानले आदर्श

हे देखील वाचा