Saturday, March 2, 2024

नाद करा पण गौतमीचा कुठं… सबसे कातीलच्या पहिल्या वहिल्या ‘घुंगरू’चं पहिलं पोस्टर आऊट

आपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यंगणा अर्थात गौतमी पाटील. गौतमी पाटीलने तिच्या नृत्याच्या जोरावर भल्याभल्यांना नाचायला भाग पाडले आहे. गौतमी पाटीलचे लाखो चाहते आहेत. गौतमी पाटील सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलचा (Gautam Patil) पहिला मराठी चित्रपट ‘घुंगरु’ येत्या 15 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बाबा गायकवाड यांनी केले असून कथा, पटकथा देखील त्यांनीच लिहिली आहे. ‘घुंगरु’ हा चित्रपट लोककलावंतांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात गौतमी एका लावणी कलावंताची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात बाबा गायकवाड देखील प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

चित्रपटाची निर्मिती बाबा गायकवाड यांच्या ‘बाबा फिल्म्स’ने केली आहे. चित्रपटाचे शूटिंग सोलापूर, माढा आणि हंपीसह परदेशात देखील करण्यात आले आहे. गौतमी पाटील ही तिच्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहेत. तिच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षक या चित्रपटाला कशी प्रतिक्रिया देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

या चित्रपटात गौतमीच्या आयुष्यातील अनेक घटना दाखवल्या आहेत. तिच्या आयुष्यातील प्रेम, संघर्ष, यशाची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात गोंधळ, राडा होताना पाहिला मिळते. त्यामुळे तिचा सिनेमा पाहायला आलेले प्रेक्षक सिनेमागृहातही राडा घालणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Have you seen the first poster of Gautam Patil first film Ghungru)

आधिक वाचा-
रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये रणवीर सन्मानित, जॉनी डेपला मानले आदर्श
नागराज मंजुळेंच्या नवीन चित्रपटाचं चांगभलं! सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात, फोटो शेअर करत दिली माहिती

हे देखील वाचा