Sunday, August 3, 2025
Home हॉलीवूड जगभरात 8 हजार कोटी कमावणाऱ्या ‘अवतार 2’ने बॉलिवूडलाही नाही सोडलं, कमावला तब्बल ‘इतका’ पैसा

जगभरात 8 हजार कोटी कमावणाऱ्या ‘अवतार 2’ने बॉलिवूडलाही नाही सोडलं, कमावला तब्बल ‘इतका’ पैसा

आता 2022 हे वर्ष संपण्याचा मार्गावर आहे. वर्षाच्या शेवटच्या डिसेंबर महिन्यात तीन मोठ्या सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळाली. एकीकडे 18 नोव्हेंबर, 2022 रोजी रिलीज झालेल्या ‘दृश्यम 2‘ सिनेमाने एक महिन्यानंतरही आपली पकड कायम ठेवली आहे, तर दुसरीकडे, ‘सर्कस‘ सिनेमा बॉक्स ऑफिसवर संघर्ष करताना दिसत आहे. मात्र, या दोन सिनेमांमध्येच भारतासोबतच जगभरात जबरदस्त कमाई करत असलेला सिनेमा म्हणजे जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार द वे ऑफ वॉटर‘ होय.

‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way of Water) हा सिनेमा 16 डिसेंबर रोजी रिलीज झाला होता. या सिनेमाने कमाईच्या बाबतीत ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) आणि ‘सर्कस’ (Cirkus) या सिनेमांना जोरदार धक्का दिला आहे. जेव्हापासून हा सिनेमा रिलीज झाला आहे, तेव्हापासून बॉक्स ऑफिसवर याच सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

हिंदी पट्ट्यात 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यास सज्ज
‘अवतार 2’ (Avatar 2) हा सिनेमा इंग्रजी भाषेतच नाही, तर इतर भाषांमध्येही चांगली कमाई करत आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम यांसह अनेक भाषांमध्ये या सिनेमाला यश मिळताना दिसत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची सुरुवात चांगल्याप्रकारे झाली होती. पहिल्या दिवशी जेम्स कॅमेरून (James Cameron) यांच्या या सिनेमाची कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि सिनेमाने पहिल्याच दिवशी 11 कोटींची जबरदस्त ओपनिंग केली होती. वीकेंडपर्यंत या सिनेमाच्या कमाईत भरमसाठ वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, वीकेंड संपताच या सिनेमाची कमाई जरा घसरल्याचे दिसले.

आता हा सिनेमा रिलीज होऊन 12 दिवस झाले आहेत. 12व्या दिवशीही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ‘सर्कस’पेक्षा जास्त कमाई केली आहे. या सिनेमाने हिंदी पट्ट्यात एकूण 88.22 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avatar (@avatar)

जगभरात किती कमावले?
हिंदी भाषेत ‘अवतार 2’ सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या मार्गावर आहे. तसेच, या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्व भाषेत एकूण 274.95 कोटींची कमाई केली आहे. ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ या सिनेमाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं, तर याच्या वादळात बॉलिवूड सिनेमे उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. या सिनेमाने जगभरात 8200 कोटी रुपयांच्या आसपास कमाई केली आहे. हा यावर्षीचा दुसरा हॉलिवूड सिनेमा आहे, ज्याने भारतीय बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. अशात हा सिनेमा त्याच्याच पहिल्या भागाचा म्हणजेच ‘अवतार’ (Avatar) सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकतो. (box office avatar 2 box office collection day 12 james camerons film doing extremely well in india and worldwide read here)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘त्या दिवशी माझ्या करिअरचा द एंड होईल…’, सलमानने 1990मध्ये लिहिलेलं खुलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल
ईशा गुप्ताने शेअर केला बेडरूममधील ‘तसला’ फोटो, चाहतेही झाले आऊट ऑफ कंट्रोल; कमेंट्स वाचाच

हे देखील वाचा