‘सिम्बा‘ आणि ‘सूर्यवंशी‘नंतर रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग यांची जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. आता हे दोघेही लवकरच ‘सर्कस‘ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच समोर आला होता, ज्यामध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सर्कसची संपूर्ण टिम एकत्र दिसली होती. या छोट्या टीझरमध्ये जॉनी लीव्हर आणि संजय मिश्रा यांनी या चित्रपटात 60 च्या दशकातील लूक असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. आता लोकांची उत्सुकता आणखी वाढवत निर्मात्यांनी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘सर्कस’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे, ज्यामध्ये रणवीर सिंगच्या डबल रोलमध्ये मल्टी टॅलेंटेड कलाकार पाहायला मिळत आहेत.
ट्रेलरची सुरुवात एका सर्कसच्या दृश्याने होते जिथे रणवीर सिंग ( ranveer singh) इलेक्ट्रिक मॅनच्या भूमिकेत प्रेक्षकांसाठी आपला अभिनय सादर करताना दिसतो. ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसा उत्साहही वाढतो. रणवीर सिंग इलेक्ट्रिक करंट देताना त्याच्या शरीरात घडणाऱ्या विचित्र गोष्टींबद्दल विचार करून गोंधळलेला दिसतो, तर संजय मिश्राच्या दमदार पंचिंग लाइन्स ऐकून आणि त्याची कॉमेडी पाहून तुम्ही पाेट धरून हसाल. रणवीर सिंगच्या ट्रेलरमध्ये फारसा संवाद नाही. रोहित शेट्टीने या ट्रेलरमध्ये काय कथा आहे याचा फारसा खुलासा केलेला नाही.
या चित्रपटामध्ये जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे महत्वाच्या भूमिका साकारत आहे. मात्र, जेव्हा लोक हा चित्रपट सिनेमागृहामध्ये पाहतील तेव्हा दीपिका पदुकोणला पाहून ते स्वत:ला शिट्टी वाजवण्यापासून राेखू शकनार नाहीत. ट्रेलरमध्ये रोहित शेट्टीने दीपिका पदुकोणची एक छोटीशी झलक दाखवली आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोण ‘तुम नाचा तो सबको करंट लगा रे’ या गाण्यावर रणवीर सिंगसोबत नाचताना दिसत आहे. दीपिका गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये रणवीरसोबत धुमाकूळ घालताना दिसत आहे.
रोहित शेट्टीचा हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर 23 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (bollywood cirkus trailer released the bollywood actor ranveer singh rohit shetty comedy film will bang the theaters in december know the movie released date)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
लग्न साेहळा! मेहंदी फंक्शनमध्ये हंसिकाने हाेणाऱ्या नवऱ्यासाेबत केला जाेरदार डान्स, पाहा भन्नाट व्हिडिओ
तीन – तीन लग्न करूनही नीलिमा अझीम आहेत एकट्याच, जाणून घ्या त्यांच्याबद्दल