बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) चित्रपट ब्रह्मास्त्र सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अवघ्या चार दिवसांत 141 कोटींचा गल्ला जमवून या चित्रपटाने सर्वांना चकित केले आहे. या चित्रपटापूर्वी रणबीरने अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण असे काही चित्रपट आहेत जे त्याने नाकारले आणि नंतर बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. आज आम्ही तुम्हाला रणबीरच्या अशाच चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.
2 स्टेट्स- 2 स्टेट्स हा चित्रपट अर्जुन कपूरच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात तो आलिया भट्टसोबत दिसला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट पहिल्यांदा रणबीर कपूरला ऑफर करण्यात आला होता. रणबीरने हा चित्रपट स्वीकारला असता तर त्याने पत्नी आलिया भट्टसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली असती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त व्यवसाय करताना 100 कोटींहून अधिक कमाई केली.
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’- लोकांना अजूनही हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल स्टारर ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ पाहायला आवडते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. दिग्दर्शक झोया अख्तरला या चित्रपटात रणबीरला कास्ट करायचे होते, असे म्हटले जाते. मात्र, असे होऊ शकले नाही आणि नंतर हे पात्र हृतिक रोशनने साकारले.
गल्ली बॉय- रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर गली बॉयचे दिग्दर्शनही झोया अख्तरने केले आहे. या चित्रपटातील रणवीरच्या भूमिकेचे लोकांनी खूप कौतुक केले. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, चित्रपटाची ऑफर प्रथम रणबीरला देण्यात आली होती, परंतु प्रकरण पुढे जाऊ शकले नाही आणि भूमिका रणवीरकडे गेली.
दिल्ली बेली – दिल्ली बेली हा देखील इम्रान खानच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेला हा चित्रपट लोकांना खूप आवडला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या चित्रपटासाठी पहिल्यांदा रणबीरला अप्रोच करण्यात आले होते.
हेही वाचा – ‘ऐतराज’ सिनेमात अक्षयच्या अपोझिट ‘तसला’ रोल मिळाल्याने ढसाढसा रडलेली प्रियांका, निर्मात्याचा खुलासा
तेव्हा अभिनेत्रींना ‘या’ गोष्टीसाठी वापरले जायचे, ‘गंगा’चा 26 वर्षांनंतर खळबळजनक खुलासा
‘बिग बॉस 16’ प्रोमोमध्ये सलमान अचानक कसा पलटला?, समोर आलेल्या व्हिडिओने फोडलं भांडं