ऐंशीच्या दशकात अनेक अभिनेत्री होत्या, ज्यांनी त्यांच्या बोल्ड लूकने खळबळ माजवली होती. त्या अभिनेत्रींमध्ये मंदाकिनी हिचाही समावेश होतो. मंदाकिनी हिने ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच सिनेमात बोल्ड सीन दिले होते. त्यांनी या पारदर्शक साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधले होते. या चित्रपटामुळे त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. याच मंंदाकिनीने आता बॉलिवूडबद्दल मोठा खुलासा केला आहे.
‘राम तेरी गंगा मैली’ (Ram Teri Ganga Maili) या चित्रपटात ‘गंगा’ बनलेली मंदाकिनी (Mandakini) काही चित्रपटांनंतर इंडस्ट्रीतून गायब झाली. अभिनेत्रीला चित्रपटापासून दूर राहून जवळपास 26 वर्षे झाले आहेत. अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान अनेक गाेष्टींचा खुलासा केला आहे. तिने सांगितले की, त्या दशकात अभिनेत्रीचे काय महत्त्व हाेते. चित्रपटात तिला कशाप्रकारे वागणूक दिली जात होती. किती कमी मानधनामध्ये अभिनेत्री काम करत हाेती.
मुलाखतीदरम्यान मंदाकिनीचा माेठा खुलासा
मंदाकिनीने सांगितले की, ‘ज्यावेळी तिने चित्रपटात पदार्पण केलं त्यावेळी अभिनेत्रीची जास्त मागणी नव्हती. तिला फक्त काही गाण्याकरीता आणि रोमँटिक सीन्ससाठी वापरले जायचे. म्हणजे चित्रपटात जास्त महत्व अभिनेत्याला दिले जात असे.’ याव्यतिरिक्त मंदाकिनी मानधनाबद्दल बाेलली, “ज्यावेळी आम्ही चित्रपटात काम करत हाेताे, त्यावेळी आम्ही पूर्ण चित्रपटासाठी 1 ते 1.5 लाख रुपये कमवत हाेताे.”
View this post on Instagram
या गाण्याबराेबर मुलाला ही केले लाँच
मंदाकिनीने ‘प्यार करके देखाे’, ‘जाेरदार’, ‘तेजाब’, ‘डांस डांस’, ‘लाेहा’ यांसारखे दमदार चित्रपट हिंदी सिनेसृष्टीला दिले. मंदाकिनी शेवटची 1996 मध्ये आलेल्या ‘जाेरदार’ चित्रपटात दिसली हाेती. ‘मां ओ मां’ (Maa O Maa) या गाण्यासोबत मंदाकिनी इंडस्ट्रीमध्ये परतली. मंदीकिनीने या गाण्यासोबत मुलगा रबील ठाकूर याला देखील लाॅन्च केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बिग बॉस 16’ प्रोमोमध्ये सलमान अचानक कसा पलटला?, समोर आलेल्या व्हिडिओने फोडलं भांडं
पंतच्या प्रेमात पडली उर्वशी? हात जोडून म्हणाली, ‘मला माफ कर…’
आता ओटीटीवरही पाहता येणार रणबीर- आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’, पण कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?