‘बिग बॉस 16’ प्रोमोमध्ये सलमान अचानक कसा पलटला?, समोर आलेल्या व्हिडिओने फोडलं भांडं

0
73
Salman-Khan
Photo Courtesy: Twitter/BiggBoss

छाेट्या पडद्यावरील प्रसिद्ध पण तितकाच वादग्रस्त असलेला शो म्हणजे ‘बिग बाॅस’ होय. या शोच्या 16व्या पर्वाचा प्राेमाे दाेन दिवसाआधी रिलीज झाला होता. व्हिडिओमध्ये अभिनेत्याच्या बाेलण्यावरून लक्षात येते की, काहीतरी गडबड आहे. याच प्राेमाेचा एक व्हिडिओ देखील समाेर आला आहे, जाे सर्वांचे लक्ष वेधत आहे.

रविवारी (दि. 11 सप्टेंबर) रात्री ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) शोचा प्राेमाे समाेर आला हाेता. यात एका विचित्र रूममध्ये सलमान खान (Salman Khan) दिसला हाेते. यात ताे बाेलताना दिसत आहे की, “15 वर्षापासून बिग बाॅसने सर्वांचा खेळ बघितला. यावर्षी बिग बाॅस आपला खेळ दाखवेल. सकाळ हाेईल मात्र, आकाशात चंद्र दिसेल. गुरुत्वाकर्षण उडेल हवेत आणि घाेडा सरळ करेल चाल. सावली देखील साेडेल साथ, खेळणार आपला खेळ. कारण यावर्षी बिग बाॅस स्वत: खेळतील.” यावरून असं लक्षात येतंय की, यावर्षी खूप सस्पेंस असणार आहे. त्याचबराेबर चाहत्यांसाठी भरपूर सरप्राईजही असतील.

‘बिग बाॅस 16’ प्राेमाेमध्ये तुम्ही निरीक्षण केलं असेल की, सलमान उभा असताना पलटून जाताे. रुममध्ये एक घाेडाही दिसताे. वस्तू सगळ्या विस्कटलेल्या दिसतात. मात्र, याचा एक बिहाइंड द सीन व्हिडिओ समाेर आला आहे. ज्यात दाखविले आहे की, प्राेमाे अखेर कसा शूट झाला आहे. तरीदेखील प्राेमाेमध्ये शाे कधी येणार याविषयी काहीही माहिती देण्यात आली नाही. माध्यमांतील वृत्तानुसार, ‘बिग बाॅस 16’चे नवीन पर्व 8-9 ऑक्टाेबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमान खानने ज्या ठिकाणी प्राेमाे शूट केला आहे, त्या ठिकाणी स्पर्धकांचेही घर आहे. यामधील काम लवकरच पूर्ण केले जाईल, ज्यात सर्व स्पर्धक राहणार आहेत. या शाेसाठी मुनव्वर फारूकी, जन्नत जुबैर, मिस्टर फैजू आणि टीना दत्ताचे नाव नक्की झाले आहे. तसेच, शिवम शर्मा, पूनम पांडे, अजमा फल्लाह, शिवांगी जोशी, मुनमुन दत्ता, जैद दरबार, बसीर अली, आरूषी दत्ता, केविन अल्मासिफर, कॅट क्रिस्टियन आणि जय दुधाने या नावांपैकीही काही जण येण्याची शक्यता आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पंतच्या प्रेमात पडली उर्वशी? हात जोडून म्हणाली, ‘मला माफ कर…’
आता ओटीटीवरही पाहता येणार रणबीर- आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’, पण कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?
‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा हिट करायचा म्हणून सांगितले जातायेत चुकीचे आकडे? बजेटइतकी कमाई करणेही कठीण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here