Tuesday, February 18, 2025
Home बॉलीवूड ‘ऐतराज’ सिनेमात अक्षयच्या अपोझिट ‘तसला’ रोल मिळाल्याने ढसाढसा रडलेली प्रियांका, निर्मात्याचा खुलासा

‘ऐतराज’ सिनेमात अक्षयच्या अपोझिट ‘तसला’ रोल मिळाल्याने ढसाढसा रडलेली प्रियांका, निर्मात्याचा खुलासा

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा जगभरात प्रसिद्ध आहे. ती बॉलिवूडव्यतिरिक्त हॉलिवूडमध्येही काम करतेय. त्यामुळे तिची फॅन फॉलोविंग भारतासोबतच परदेशात देखील आहे. आपल्या चित्रपटांमुळे आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी प्रियांका आज सुपरस्टार बनली आहे. मात्र, एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्रीला सुरुवातीच्या काळात अनेक नकारांना सामोरे जावे लागले होते. इतकंच नाही, तर अनेक दिग्दर्शकांनी तिला अत्यंत वाईट वागणूकही दिली असल्याचा खुलासा इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी केला आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुनील दर्शन (Suneel Darshan) यांनी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यांचा एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, ‘ऐतराज’ (Aitraaz) चित्रपटात प्रियांकाला अक्षयच्या विरुद्ध भूमिका मिळाल्यानंतर ती खूप रडली. सुनील म्हणाले, “जेव्हा निर्माते सुभाष घई यांनी प्रियांकाला अक्षयच्या विरुद्ध ऐतराज चित्रपटात पुरुषांचा गैरफायदा घेणाऱ्या महिलेची भूमिका करण्याची ऑफर दिली, तेव्हा तिला धक्काच बसला. एवढेच नाही, तर ती खूप नाराज झाली होती. या भूमिकेची ऑफर मिळाल्यानंतर प्रियांका घरी जाऊन खूप रडली.”

सुनील दर्शन पुढे म्हणाले, “घरी रडल्यानंतर प्रियांका माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की, तिला अक्षयच्या विरुद्ध व्हॅम्पची भूमिका देण्यात आली आहे. मी प्रियांकाला समजावून सांगितले की, ही खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि ती करायला हवी. मी म्हणालो, ‘प्रियांका तू यावेळी खूप भावूक झाली आहेस आणि तुला आता नीट विचार करता येत नाहीये, त्यामुळे तू आराम कर.’ मी समजवल्यानंतर प्रियांकाने ही भूमिका करण्यास होकार दिला.”

प्रियांकाने ‘ऐतराज’मध्ये साकारलेली सोनियाची भूमिका तिच्या करिअरमधील सर्वात दमदार भूमिकांपैकी एक आहे. 2004 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्याशिवाय करीना कपूर, अन्नू कपूर आणि अमरीश पुरी यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तेव्हा अभिनेत्रींना ‘या’ गोष्टीसाठी वापरले जायचे, ‘गंगा’चा 26 वर्षांनंतर खळबळजनक खुलासा
‘बिग बॉस 16’ प्रोमोमध्ये सलमान अचानक कसा पलटला?, समोर आलेल्या व्हिडिओने फोडलं भांडं
पंतच्या प्रेमात पडली उर्वशी? हात जोडून म्हणाली, ‘मला माफ कर…’

हे देखील वाचा