Saturday, June 29, 2024

ब्रेकिंग! ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन, कलाविश्वावर शोककळा!

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे आज (गुरुवार, दिनांक 24 ऑगस्ट) निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या.

चित्रपटांमध्ये सीमा देव (Seema Dev )यांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता. सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंत 80पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं. काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करणे बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला.

अभिनेते रमेश देव हे सीमा देव यांचे पती आहे. त्या दोघांनी 1953 साली लग्न केले होते. तब्बल इतक्या वर्षांनी आता या प्रेमळ जोडप्याची साथ सुटली आहे. पण काल, आज आणि उद्याही या जोडीची चर्चा ही होतच राहील. याचं कारण म्हणजे रील लाईफ जोडी ते रियल लाईफ पार्टनर पर्यंतचा त्यांचा प्रवास हा अतिशय रंजक आहे. रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांना मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन जोडपे म्हटले जाते.

यातील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे, या दोघांनी मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटांमध्ये खूप काम केले आहे. रियल-लाइफ कपलने तब्बल 73चित्रपटांमध्ये पती-पत्नीची भूमिका साकारली आहे. या दोघांचे अनेक चित्रपट पडद्यावर आले आणि प्रेक्षकांना दोघांची जोडी खूप आवडली. त्यांना अजिंक्य आणि अभिनव असे दोन मुलं आहेत. सीमा त्यांचा मुलगा अभिनय देव यांच्यासोबत मुंबईतील वांद्रे याठिकाणी राहत होत्या. अभिनवदेखील मनोरंजन विश्वात दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. सीमा यांच्या पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. (Breaking News Veteran Actress Seema Dev Passes Away)

अधिक वाचा- 
नागराज मंजुळेंचा नाद भरी प्रवास! आधी ॲक्टर मग डायरेक्टर आता थेट डॉक्टर
वाढदिवस विशेषः अवघ्या महाराष्ट्राला ‘याड’ लावणाऱ्या नागराज मंजुळेंचा थक्क करणारा प्रवास

हे देखील वाचा