Tuesday, October 14, 2025
Home हॉलीवूड अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्स पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात, अवघ्या ५५ तासांत तोडले होते पुर्वीचे लग्न

अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्स पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात, अवघ्या ५५ तासांत तोडले होते पुर्वीचे लग्न

अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्स पुन्हा एकदा तिच्या रोमान्समुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच ब्रिटनीने सोशल मीडियावर बॉयफ्रेंड सॅम असगरीसोबत तिच्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. ब्रिटनी स्पीयर्स ही ३९ वर्षाची आहे. तिने तिच्या सोशल मीडिया पोस्टवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत बॉयफ्रेंड सॅम असगरीही उपस्थित आहे. व्हिडिओमध्ये ब्रिटनी हिऱ्याची अंगठी दाखवताना दिसत आहे. त्याचबरोबर सॅम असगरीने आपल्या इंस्टाग्रामवर ब्रिटनीच्या हातात अंगठी घातलेला एक फोटोही शेअर केला आहे.

ब्रिटनी आणि सॅमच्या प्रेमकथेबद्दल सांगायचे झाल्यास, दोघे २०१६ मध्ये स्लंबर पार्टी या म्युझिक व्हिडिओच्या शूटिंग दरम्यान भेटले होते. यानंतर, दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ज्याचे नंतर प्रेमात रूपांतर झाले. (American singer Britney Spears to tie the knot once again, breaking previous record)

ब्रिटनी करणार तिसऱ्यांदा लग्न
ब्रिटनीचे हे पहिले लग्न नाही. तिने यापूर्वी रॅपर केव्हिन फेडरलाइनशी लग्न केले होते. ज्याच्यापासून तिला दोन मुले आहेत. यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर ब्रिटनीने अमेरिकन अभिनेता आणि कॉमेडियन जेसन अलेक्झांडरशी लग्न केले. ब्रिटनीचा हा विवाह विक्रम ५५ तासात मोडला गेला. आता तिचे नाव सॅम असगरीशी जोडले गेले आहे. ब्रिटनी स्पीयर्स त्याच्याशी लग्न करते की, हे संबंध फक्त साखरपुड्यापर्यंतच राहतात का हे पाहणे महत्वाचे असेल.

कोण आहे सॅम असगरी
सॅम असगरीचे वय वर्ष २७ असून त्याचा जन्म इराणमध्ये झाला. तो इराणी वंशाचा अमेरिकन वैयक्तिक ट्रेनर आहे. तो एक अभिनेता देखील आहे. वयाच्या १२ व्या वर्षी असगरी इराण सोडून लॉस एंजेलिसला गेला. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत असगरीने सांगितले होते की, “जेव्हा तो अमेरिकेत आला तेव्हा त्याला इंग्रजीही येत नव्हते. त्याच्यासाठी हा एक सांस्कृतिक धक्का होता, जिथे त्याला पूर्णपणे भिन्न इंग्रजी बोलायचे होते.”

वाईट टप्प्यातून जात आहे ब्रिटनी
अमेरिकन पॉप स्टार ब्रिटनीने तिच्या तिसऱ्या नात्याची घोषणा केली असेल. पण ती २००८ पासून एका वाईट टप्प्यातून जात आहे. तिची कारकीर्द आणि आर्थिक परिस्थिती आता कायदेशीर संरक्षकाच्या हातात आहे. २००८ पासून तिच्या खराब मानसिक आरोग्यामुळे ती पालक म्हणून कायदेशीर संरक्षकाच्या हातात आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, तिच्या वडिलांना तिच्या मालमत्तेवर आणि तिच्या जीवनातील इतर पैलूंवर नियंत्रण देण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्लॅक ब्युटी!’ पूजा सावंतच्या काळ्या ड्रेसमधील फोटोंनी चुकवला नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका

-तेजश्री प्रधानच्या सौंदर्याने घातली चाहत्यांना भुरळ, खण पैठणीतील फोटो होतोय व्हायरल

-सोशल मीडियावर पुन्हा एकदा सई लोकुरचा जलवा, पाहायला मिळाला अभिनेत्रीचा दिलखेचक अंदाज

हे देखील वाचा