Saturday, April 20, 2024

सोशल मीडियावर पुन्हा एकदा सई लोकुरचा जलवा, पाहायला मिळाला अभिनेत्रीचा दिलखेचक अंदाज

‘बिग बॉस मराठी’ फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सई लोकूर होय. सई लोकुर ही चित्रपटासोबत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. ती तिच्या पतीसोबत देखील अनेकवेळा फोटो शेअर करत असते. अशातच सईने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

सईने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सईने चॉकलेटी रंगाची प्लेन साडी नेसलेली आहे. या साडीतील मुख्य आकर्षण म्हणजे साडीचा पदर. या साडीचा पदर मोरपंखी रंगाचा आहे. तिने साडीच्या पदराला मॅचिंग असा ब्लाऊज घातला आहे. तसेच मोरपंखी रंगाची ज्वेलरी घातली आहे. तसेच तिने ऑक्साइड बांगड्या आणि कानातले घातले आहेत. या फोटोमध्ये ती सुरेख दिसत आहे. याच लूकमधील तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अलीकडेच तिने तिच्या पतीसोबत काही फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटोंना देखील चाहत्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. (Marathi actress sai lokur share her photos on social media)

सईने डिसेंबर २०२० मध्ये तीर्थदीप रॉय याच्याशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. आजकाल सई सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे तिचे चाहते देखील खूप खुश आहेत.

सई ही ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक होती. या शोमध्ये ती फिनालेपर्यंत गेली होती. पण ती हा शो जिंकू शकली नव्हती. त्यानंतर ती खूप चर्चेत आली. या शोने तिला खरी ओळख मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात असताना तिची आणि पुष्कर जोगची मैत्री खूप चर्चेत आली होती.

सई लोकूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘किस किस को प्यार करू’, ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘जरब’, ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’, ‘मी आणि तू’, ‘स्माईल प्लिज’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! मल्याळम अभिनेता रिजाबावा यांचे दीर्घ आजाराने झाले निधन

-सिद्धार्थच्या निधनानंतर ॲडमिट झाली होती जसलीन, नवीन व्हिडिओमुळे पुन्हा झाली ट्रोल

-Bigg Boss OTT: ‘राकेश तालावर नाचणारा नाहीये’, काम्या पंजाबीने साधला शमिता शेट्टीवर जोरदार निशाणा

हे देखील वाचा