‘ब्लॅक ब्युटी!’ पूजा सावंतच्या काळ्या ड्रेसमधील फोटोंनी चुकवला नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका


मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. पूजा सावंतने चित्रपटसृष्टीमध्ये तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिचा अभिनय‌ आणि नृत्य पाहता क्षणीच सगळे तिच्या प्रेमात पडतात. तसेच पूजा सावंत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. पूजाचे चाहते देखील तिच्या प्रत्येक फोटो वर त्यांच्या प्रतिक्रिया देत असतात. अशातच पूजाचा काही सुंदर फोटो समोर आले आहेत.

पूजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिने गळ्यात लाल आणि चंदेरी रंगाचा नेकलेस घातला आहे. तसेच तिने सगळे केस मोकळे सोडले आहेत. हातात बांगड्या घातल्या आहेत. या लूकमध्ये ती खूप आकर्षक दिसत आहे. तसेच पायात हिल्स घातले आहेत. ( Marathi actress pooja sawant’s new photo viral on social media)

हा फोटो शेअर करून पूजाने लिहिले आहे की, “तुम्ही तुमचा चांगुलपणा जपून ठेवा बाकी तुम्ही तुमच्यापरीने खूप सुंदर आहात.” तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत.

पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून २०१० मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. या चित्रपटात तिने भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी या कलाकारांसोबत काम केले होते. त्यानंतर तिने ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, ‘झकास’, ‘नीलकंठ मास्टर’, ‘चिटर’, ‘वृंदावन’, ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटात काम केले आहे. पूजा सावंत तिच्या डान्समुळे देखील खूप लोकप्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! मल्याळम अभिनेता रिजाबावा यांचे दीर्घ आजाराने झाले निधन

-सिद्धार्थच्या निधनानंतर ॲडमिट झाली होती जसलीन, नवीन व्हिडिओमुळे पुन्हा झाली ट्रोल

-Bigg Boss OTT: ‘राकेश तालावर नाचणारा नाहीये’, काम्या पंजाबीने साधला शमिता शेट्टीवर जोरदार निशाणा


Leave A Reply

Your email address will not be published.