तेजश्री प्रधानच्या सौंदर्याने घातली चाहत्यांना भुरळ, खण पैठणीतील फोटो होतोय व्हायरल


झी मराठीवरील ‘होणार सून मी घरची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला एक सुंदर आणि सोज्वळ अशी अभिनेत्री आली होती. तिच्या अभिनयाची जादू एवढी आहे की, अजूनही त्या मालिकेतील तिचा अभिनय कोणताही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. तिने महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य केले आहे. ती अभिनेत्री म्हणजे सर्वांची लाडकी तेजश्री प्रधान होय. तेजश्रीने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तेजश्री सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक गोड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

तेजश्रीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तेजश्रीने खण पैठणी घातली आहे. गळ्यात एक सुंदर नेकलेस घातला आहे. कानात झुमक घातले आहेत. हातात बांगड्या तसेच कपाळी चंद्राची कोर लावली आहे. एकंदरीत या लूकमध्ये ती फारच गोड दिसत आहे. फोटोमधील मेकअप देखील तिच्या या लूकला साजेसा आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. (Marathi actress tejshri pradhan share her photo on social media)

तेजश्रीने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

तेजश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिची होणार ‘सून मी या घरची’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजली होती. या मालिकेतील तिच्या जान्हवी नावाच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. तसेच तिची ‘अगंबाई सासूबाई’ ही मालिका देखील खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील तिचे शुभ्रा नावाचे अत्यंत समंजस, विचारी आणि प्रॅक्टिकल पात्र प्रेक्षकांना खास पसंत पडले होते. याशिवाय तिने ‘लेक लाडकी या घरची’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘लग्न पहावे करून’, ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! मल्याळम अभिनेता रिजाबावा यांचे दीर्घ आजाराने झाले निधन

-सिद्धार्थच्या निधनानंतर ॲडमिट झाली होती जसलीन, नवीन व्हिडिओमुळे पुन्हा झाली ट्रोल

-Bigg Boss OTT: ‘राकेश तालावर नाचणारा नाहीये’, काम्या पंजाबीने साधला शमिता शेट्टीवर जोरदार निशाणा


Leave A Reply

Your email address will not be published.