Sunday, April 14, 2024

कियाराचा सुरू होता मेकअप, तेवढ्यात शाहिद ओरडला, ‘किसने टच किया इसको***’, व्हिडिओ तुफान व्हायरल

छोट्या पडद्यावर आणि ओटीटीवर प्रदर्शित होणारे शो प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळेच कदाचित एकापाठोपाठ या शोजचे अनेक पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. या शोपैकीच एक म्हणजे ‘कॉफी विथ करण‘ होय. या टॉक शोने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. या शोचे आतापर्यंत ६ पर्व येऊन गेले आहेत. आता हा शो सातव्या पर्वात पोहोचला आहे. या शोमध्ये कलाकार त्यांच्या सिनेमांचे प्रमोशन करायला येतात. यासोबतच त्यांच्या आयुष्यातील रंजक आणि गुपीतेही सांगत असतात. अशात अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता शाहिद कपूर यांनी या शोमध्ये दिसणार आहे.

अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) ही पहिल्यांदाच ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या शोमध्ये झळकणार आहे. दुसरीकडे, शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा त्याच्या एक्स गर्लफ्रेंडव्यतिरिक्त त्याची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) हिच्यासोबत या शोमध्ये झळकला आहे. आता कियारा आणि शाहिदचा बीटीएस व्हिडिओ (Kiara And Shahid BTS Video) समोर आला आहे. या व्हिडिओत हे दोघेही त्यांचा ‘कबीर सिंग’ या सुपरहिट सिनेमातील एक सीन रीक्रिएट करताना दिसत आहेत.

व्हिडिओत दिसते की, शाहिद आणि कियारा ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर दिसत आहेत. यादरम्यान कियारा तिचा टचअप करत असते आणि त्यादरम्यान शाहिद तिथे पोहोचतो. शाहिद जोरात ओरडतो की, “ओए… किसने टच किया इसको… प्रीती…” यानंतर शाहिद आणि कियारा दोघेही जोरजोरात हसू लागतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

शाहिद म्हणाला, ‘कॉफी विथ कियारा’
यापूर्वी शाहिदने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्याने कियारासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला शाहिदने मजेशीर कॅप्शन दिले होते. त्याने लिहिले होते की, “#KoffeeWithKiara… ही अशी गोष्ट आहे, माफ करा करण जोहर, कियारा आडवाणी कॉफी विथ करणप्रमाणे तिचा स्वत:चा टॉक शो सुरू करत आहे.” विशेष म्हणजे, करणने या फोटोवर कमेंट करत लिहिले होते की, “मला हे आवडले आहे. आशा आहे, ती माझी नोकरी घेणार नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

शाहिद कपूर याच्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जर्सी’ या सिनेमात झळकला होता. त्यानंतर आता तो ‘बुल’ या सिनेमात काम करताना दिसणार आहे. दुसरीकडे, कियारा आडवाणी ही २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जुग जुग जिओ’ या सिनेमात झळकली होती. आता ती राम चरणच्या ‘आरसी१५’ या सिनेमात काम करताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
चाहत्यांसाठी खुशखबर! कार्तिक आर्यन आणि रश्मिकाची जोडी करणार एकत्र काम
फरहान शिबानी होणार आई बाबा? व्हायरल फोटोमुळे रंगली चर्चा
‘वडापाव कोणेकाळी आधार होता’, अमोल कोल्हेंना आठवला संघर्षाचा काळ

हे देखील वाचा