Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

अशाप्रकारे शूट झाला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील रोमॅंटिक सीन शूट, प्रार्थनाने केला व्हिडिओ शेअर

माझी तुझी रेशीमगाठ‘ ही झी मराठीवरील सध्या लोकप्रिय असणारी मालिका आहे. या मालिकेने प्रोमोपासूनच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मालिकेत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयश तळपदे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना देखील मालिका खूप आवडते. मालिकेचे खास आकर्षण म्हणजे मालिकेत असणारी चिमुरडी मायरा वैकुळ म्हणजेच सर्वांची लाडकी परी तिने लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. नुकतेच या मालिकेचे १०० एपिसोड पूर्ण झाले आहेत. या निमित्त मालिकेतील कलाकारांनी केक कापून सेलिब्रेशन देखील केले आहे.

मालिकेत अनेक नवीन वळणं येत आहेत. अशातच मालिकेत नेहा आणि परांजपे यांचा लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. मालिकेत नुकताच एक सीन शूट झाला आहे. या सीनमध्ये नेहा आणि यश यांच्या अंगावर फॅनवरून गुलाबाची फुले पडतात आणि एकंदरीत एक रोमँटिक वातावरण होऊन जाते. अशातच नेहाने म्हणजेच प्रार्थनाने या सीनचा एक बीटीएस व्हिडिओ शेअर करून सांगितले आहे की, हा सीन नक्की कसा शूट झाला आहे. (BTS video of majhi tujhi reshimgath serial)

प्रार्थनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, त्यांचा गुलाबाच्या पाकळ्या फॅनवरून पडताना सीन शूट होत असतो. यावेळी तिथे अनेक लोकं उपस्थित असतात आणि ते त्यांच्या अंगावर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या टाकत असतात.

हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “किती रोमँटिक आहे ना?” तिच्या या व्हिडिओवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. हा सीन टीव्हीवर पाहताना सगळ्यांना खूप मजा आली आहे. तेवढीच मजा हा सीन शूट करताना पाहून प्रेक्षकांना आणखी मजा आली आहे. मालिकेत लवकरच परांजपे यांचा पर्दाफाश होणार आहे आणि नेहाला त्याचे सत्य समजणार आहे असा ट्रॅक चालू होणार आहे. याचे काही प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा :

नवीन घराच्या बाल्कनीमध्ये रोमॅंटिक झाले कॅटरिना आणि विकी, शेअर केला क्युट फोटो

जिममध्ये वर्कआउट करताना थिरकल्या सोनाली खरे अन् ईशा केसकर, चाहता म्हणाला…

नव्या वर्षात महेश मांजरेकरांचा नवा मराठी चित्रपट, ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ 

 

हे देखील वाचा