Wednesday, December 6, 2023

जिममध्ये वर्कआउट करताना थिरकल्या सोनाली खरे अन् ईशा केसकर, चाहता म्हणाला…

आपल्या आयुष्यात फिटनेसला खूप महत्व आहे. दैनंदिन जीवनात बॉडी फिट ठेवण्यासाठी सगळेच व्यायाम करत असतात. परंतु कलाकार म्हटल्यावर ते त्याच्या फिटनेसकडे काही खास लक्ष देतात. याची माहिती ते नेहमीच सोशल मीडियावर देत असतात. अशातच दोन मराठी तारकांचा जिममधील वर्कआउट करताना एक व्हिडिओ समोर आला आहे. या अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे आणि ईशा केसकर. या दोघीही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. त्यांच्या अभिनयाने त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. अशातच या दोघींचा एक सुंदर व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

अभिनेत्री सोनाली खरे हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत ईशा केसकर दिसत आहे. त्या दोघी जिममध्ये वर्क आउट करताना डान्स करत आहेत. त्यांचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांचे अनेक चाहते या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. (Sonali khare and isha keskar gym work out video viral on social media)

हा व्हिडिओ शेअर करून सोनालीने कॅप्शन दिले आहे की, “मुलींना मस्ती करायला खूप आवडते.” अनेकजण या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “तुम्ही दोघी एवढी बहिणी दिसत आहेत.” तसेच बाकी अनेकजण हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट करत आहेत.

ईशाने झी मराठीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले होते. तसेच तिने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत देखील काही दिवसांसाठी शनाया हे पात्र निभावले होते. तसेच सोनालीने ‘स्माउल प्लीज’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘वेल डन बेबी’ या चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा :

बिग बॉस मराठीच्या घरात भरली पत्रकार परिषद, स्पर्धकांवर केला प्रश्नांचा भडिमार

लग्नानंतर अंकिता लोखंडेने शेअर केला गृह्प्रवेशाचा व्हिडिओ, पत्नीची साडी सांभाळताना दिसला विकी

‘जिंकूनच ये’, मीनल शहाला प्रोत्साहन देत, ‘या’ व्यक्तीने दिला खास मेसेज

 

 

हे देखील वाचा