Tuesday, February 18, 2025
Home बॉलीवूड व्हिडिओ: पाहा दबंग खान सलमान कसा शिकला ‘सिटी मार’ गाण्याच्या अवघड डान्स स्टेप्स, प्रभूदेवाने देखील केले कौतुक

व्हिडिओ: पाहा दबंग खान सलमान कसा शिकला ‘सिटी मार’ गाण्याच्या अवघड डान्स स्टेप्स, प्रभूदेवाने देखील केले कौतुक

बॉलिवूड दबंग खान सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटातील ‘सिटी मार’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रदर्शित होता क्षणातच खूप लोकप्रिय झाले आहे. हे गाणे दक्षिण चित्रपट सृष्टीतील ‘डीजे’ या चित्रपटातील गाण्याचे रीमेक आहे. मूळ गाणं सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. आता या गाण्याला हिंदी वर्जनमध्ये सलमान खानच्या राधे या चित्रपटात घेतले आहे. या गाण्यात सलमान खानसोबत दिशा पटानी ठुमके मारताना दिसत आहे. याच गाण्याचा बीटीएस अर्थात मेकिंग व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दिशा आणि सलमान त्यांचा या गाण्याचा अनुभव शेअर करत आहेत. तसेच गाण्यासाठी तयारी करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये प्रभूदेवा असे म्हणत आहेत की, सलमान खानने या गाण्यातील अनेक स्टेप्ससाठी खूप मेहनत घेतली आहे. या गाण्यातील हुक स्टेप देखील खूप व्हायरल झाली आहे. दिशाने सांगितले की, सलमान खानच्या काही स्टेप्स खूप अवघड होत्या, पण त्याने त्या खूपच सोप्प्या पद्धतीने केल्या.

 

या बीटीएस व्हिडिओमध्ये दिशा आणि सलमान अनेक डान्स स्टेप करताना दिसत आहेत. प्रभूदेवा यांचे असे म्हणणे होते की, सलमान आणि दिशाने या गाण्यावर डान्स करावा आणि शेवटी तसेच झाले. तसेच त्यांनी सांगितले की, सलमान खान कशाप्रकारे डान्स स्टेप्समधून त्याच्या भूमिकेत शिरतो.

या गाण्याला ‘कमाल खान’ आणि ‘यूलिया वंतुर’ यांनी गायले आहे, तर ‘शब्बीर अहमद’ यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहे. तसेच ‘देवी श्री प्रसाद’ यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. तसेच ‘शेख जानी बाशा ‘यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केली आहे.

या चित्रपटात सलमान खानसोबत दिशा पटानी आणि जॉकी श्रॉफ देखील महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. या चित्रपटाला सलमान खान फिल्म्सने झी स्टुडिओ सोबत मिळून प्रस्तुत केले आहे. सलमा खान, सोहेल खान आणि रिल लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडद्वारा निर्माण झालेला हा चित्रपट येत्या 13 मेला चित्रपटगृहात आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नुसता राडा…राडा! अल्लू अर्जुनच्या ‘बुट्टा बोम्मा’ गाण्याने मोडले इतर गाण्यांचे रेकॉर्ड; मिळाले तब्बल ५९ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

-माणसातील देव म्हणतात तो हाच! विमानतळावर भेटलेल्या अनोळखी व्यक्तीलाही सोनू सूदने दिले मदत करण्याचे वचन

-प्रेम हे! विराट कोहलीने गायले होते पत्नी अनुष्का शर्मासाठी ‘हे’ गाणे, अभिनेत्रीचे डोळे आले होते भरून

हे देखील वाचा