Monday, July 8, 2024

By By 2022| यंदा लग्नबंधनात अडकेलेले मराठी कलाकार

मराठी आणि हिंदी कालाविश्वता 2022 हे वर्ष अनेक कालाकारांसाठी खूपच चांगलं गेलं त्याशिवाय अनेक कालाकारांनी अनेक वर्षापसून नात्यात असलेल्या जोडप्यांनी त्यांच्या नात्याला लग्नबंधनात अडकवले आहेत. आता 2022 हे वर्ष संपत आलं आहे तर आज आपण मराठी मनोरंजनामधील 2022 मधील लग्नबंधनात अडकलेल्या कालाकारांची यादी पाहाणार आहोत.

शिवानी रांगोळे- विराजस कुलकर्णी
मराठमोळी अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) हिने मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहेत. तिने अभिनेता आणि लेखक विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. विराजस आणि शिवानी यांनी एकत्र काम केलं नसलं तरी ते एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केलं आणि शेवटी 2022 साली त्यांनी आपल्या नात्याला लग्नबंधनात अडकवले.

हृता दुर्गुळे- प्रतिक शहा
‘फुलपाखरु’ मालिकेतून घराघरामध्ये पोहोचणारी लोकप्रिय आणि महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिला ओळखले जाते. तिने हिंदी दिग्दर्शक प्रतिक शाह (Pratik Shaha) याच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. हृताने काही दिवस प्रतिकला डेट केलं आणि शेवटी तिने सोशल मीडियावर तिच्या प्रेमाची कबुली दिली आणि काही दिवसांनी पारंपारिक पद्धतीने थाटामाटात लग्नसोहळा उरकला.

राणादा-पाठकबाई
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम राणादा आणि पाठकबाई म्हणजेच हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) याच्या लग्नाच्या अनेक दिवसांपासून चार्चा सुरु झाल्या होत्या. मालिकेच्या सेटवरच यांच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली आणि यी जोडप्याने पुण्यामध्ये खूप थाटामाटत लग्न सोहळा उरकला.

अमृता पवार – नील पाटील
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता पवार हिने मराठी वाहिणीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेशिवाय तिने अनेक मालिकांमध्ये कौतुक करणाऱ्या भूमिका नीभावल्या आहेत. तिने (दि, 6 जुलै ) रोजी नील पाटील याच्याशी लग्न केले. अमृताचा पती इंडस्ट्रीमधील नसून एक इंजिनिअर आहे. त्यांनी त्यांच्या लग्नसोहळ्यामध्ये जवळच्या लोकांनाच निमंत्रण दिले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भावाच्या बर्थडे पार्टीत अडखळताना दिसला सोहेल खान; युजर्स म्हणाले, ‘ड्रग ऍडिक्ट…’
Bye Bye 2022 । बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसाठी हे वर्ष ठरलं खूपच वाईट, काहींनी केली जेलवारी

हे देखील वाचा