Tuesday, July 23, 2024

‘मी काय शाहरुख खान नाही….’, अमृता सिंगने कोट्यवधींची पोटगी मागताच सैफ अली खानने दिली होती प्रतिकिया

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrita Singh) त्यांच्या चित्रपट कारकिर्दीसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. सैफ आणि अमृता यांचे लग्न १९९१ मध्ये झाले होते. हे लग्न खूप गाजले होते, त्यामागे दोन खास कारणे होती. एक म्हणजे अमृता त्यावेळची इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तर सैफने तेव्हा चित्रपटात पदार्पणही केले नव्हते. दुसरीकडे, सैफ वयाने अमृतापेक्षा खूपच लहान होता.

लग्नाच्या वेळी सैफ २१ वर्षांचा होता, तर अमृता सिंग ३३ वर्षांची होती. या लग्नापासून त्यांना सारा अली खान (Sara Ali Khan) आणि इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) ही दोन मुले झाली. लग्नाच्या काही वर्षानंतर सैफ आणि अमृता सिंग यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि १३ वर्षांच्या लग्नानंतर २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मात्र, प्रकरण इथेच संपले नाही.

माध्यमांतील वृत्तानुसार, घटस्फोटाच्या बदल्यात अमृता सिंगने सैफ अली खानकडे मोठी पोटगी मागितली होती. अमृताने सैफकडे पोटगी म्हणून ५ कोटी रुपयांची मागणी केल्याचे बोलले जात आहे. इतकंच नाही, तर मुलगा इब्राहिमच्या वयाच्या १८ वर्षांपर्यंत सैफ अली खानला दरमहा १ लाख रुपये मोजावेही लागत होते.

एका मुलाखतीत सैफने पोटगीशी संबंधित प्रश्नावर सांगितले होते की, “माझ्याकडे इतके पैसे नाहीत, मी काही शाहरुख खान नाही, पण तरीही मी तिला वचन दिले आहे की, मला कितीही कष्ट करावे लागले तरी मी करेल आणि हे सर्व तिला देईन.” अमृतापासून वेगळे झाल्यानंतर सैफ अली खानने अभिनेत्री करीना कपूर खानसोबत (Kareena Kapoor Khan) २०१२ मध्ये लग्न केले. आता सैफ अली खान आणि करीना कपूर यांना तैमूर आणि जेह नावाची दोन मुले आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा