Thursday, April 25, 2024

‘घोस्ट रायडर’चे ५७ व्या वर्षी चक्क पाचव्यांदा लग्न; पूर्व पत्नींनीही लावली लग्नाला हजेरी

आजकालच्या जगात नाते जितक्या लवकर बनते, तितक्या लवकर ते तुटतेही. काही लोक पहिले लग्न मोडून दुसरे लग्न करतात, तर काही दुसरे लग्न मोडून तिसरे करतात. मात्र, हॉलिवूडच्या एका अभिनेत्याने चक्क पाचव्यांदा लग्न केले आहे.

अभिनेता निकोलस केज नेहमीच माध्यमांमध्ये झळकत असतो. यावेळी तो पाचव्यांदा लग्न केल्यामुळे चर्चेत आला आहे. 57 वर्षीय निकोलसने त्याची 26 वर्षांची गर्लफ्रेंड रीको शिबाताशी लग्न केले आहे. ‘घोस्ट रायडर’मध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या निकोलस केजने 16 फेब्रुवारीला लग्न केले.

निकोलस केज आणि रीको शिबाता यांचे लग्न लास व्हेगासमधील एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडले. लग्नात केवळ विशेष लोक उपस्थित होते. खास गोष्ट म्हणजे निकोलसच्या पूर्व बायकासुद्धा या विवाह सोहळ्याला हजर होत्या.

लग्नाच्या जवळपास एक महिन्यानंतर निकोलसने रीकोसोबत त्याच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांनी या फोटोंना खूप पसंतीही दिली. अमेरिकन आणि जपानी संस्कृती एकत्र करून या दोघांचे लग्न झाले आहे. रीकोने लग्नात पारंपारिक जपानी किमोनो घातला होता. त्याच वेळी निकोलस काळ्या रंगाच्या टॉम फ्रेडोच्या टक्सिडोमध्ये दिसला.

या सोहळ्यामधून समोर आलेल्या एका फोटोमध्ये रीकोने किमोनो घालून तिचे केस मोकळे सोडले आहेत. चमकदार लाल लिपस्टिकने तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. तिने डोळ्याला सोनेरी रंगाचा आयशॅडो लावला आहे. याव्यतिरिक्त तिच्या हातात एक पिवळसर रिबन असलेला पुष्पगुच्छ होता.

लग्नासाठी निकोलसने 16 फेब्रुवारी हा दिवस निवडला कारण त्याला त्याच्या दिवंगत वडिलांचा वाढदिवस खास बनवायचा होता, असे म्हटले जात आहे. निकोलस केजचे वडील ऑगस्ट कोपला एक प्रसिद्ध लेखक होते. त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1934 रोजी झाला होता. 2009 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-केजीएफ स्टार यश प्रेमळ बापाच्या भूमिकेत; बाप- लेकाच्या व्हिडिओला मिळतंय चाहत्यांकडून अफाट प्रेम

-पद्मिनी कोल्हापुरेच्या मुलाच्या लग्नात श्रद्धाचे जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहून थिरकतील तुमचेही पाय

-‘मी त्याला अनेकदा मरताना पाहिलंय…’, सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावुक, व्हिडिओ केला शेअर

हे देखील वाचा