जेव्हा एखादी व्यक्ती नात्यात येत असते, तेव्हा ती अनेकदा जोडीदारावर काही अटी घालत असते. जेणेकरून, पुन्हा काही अडचण निर्माण व्हायला नको. जसे की, मुलगा किंवा मुलगी नोकरी करणारी असावी, त्यांना स्वयंपाक यावा, असं बरंच काही. मात्र, हॉलिवूडचा एक अभिनेता आहे, त्याची अट ही जगावेगळीच आहे. त्याने खुलासादेखील केला आहे की, जर त्याला एखाद्या मुलीला डेट करायचे असेल, आणि त्या मुलीला जर कुत्रे आवडत नसतील, तर तो त्या व्यक्तीला डेट करणार नाही. हा अभिनेता इतर कुणी नसून ‘कॅप्टन अमेरिका‘ फेम ख्रिस इव्हान्स आहे.
अभिनेता ख्रिस इव्हान्स (Chris Evans) याने खुलासा केला आहे की, तो अशा व्यक्तीला डेट करणार नाही, ज्याला कुत्र्यांवर प्रेम नाही. ख्रिसकडे डोझर नावाचा एक कुत्रा आहे. त्याने हे सांगितले आहे की, तुम्हाला याची खात्री पटवावी लागेल की, ज्या व्यक्तीमध्ये तुम्हाला रस आहे, त्याला कुत्र्यांवर प्रेम आहे. ४१ वर्षीय अभिनेता ख्रिसने आपले मत मांडत म्हटले की, डोझर हा खूपच चांगला कुत्रा आहे. तो नेहमी तेच करतो, जे त्याला सांगितले जाते.
View this post on Instagram
ख्रिस इव्हान्स याने त्याच्या कुत्र्याचे नाव हे ऍनिमेटेड क्लासिक ‘ऑलिव्हर कंपनी’च्या एका पात्राच्या नावावरून ठेवले आहे. यासोबतच तो म्हणाला की, “जेव्हा मी पहिल्यांदा डोझरला पाहिले, तेव्हा मी असा होतो की, ओह यार तो ‘ऑलिव्हर कंपनी’वरून डोझरची आठवण करून देतो. हो एक आकस्मिक विचार होता. त्यानंतर नाव घेऊन येण्याच्या प्रयत्नात मी डोझरला माझ्या मनातून बाहेर काढू शकलो नाही.”
View this post on Instagram
सिंगल आहे ख्रिस इव्हान्स
खरं तर, अभिनेता ख्रिस इव्हान्स हा सन २०१८पासून सिंगल आहे. नुकतेच त्याने सांगितले की, तो एका जीवनसाथीच्या शोधात आहे. ख्रिस याने मार्व्हल सीरिजच्या ‘कॅप्टन अमेरिका’ आणि ‘ऍव्हेंजर्स’ सीरिजमधील दमदार ऍक्शन आणि अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
नुकताच त्याचा ‘द ग्रे मॅन’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. यासोबतच तो लवकरच पेन हसलर्स या सिनेमात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन डेव्हिड याट्स करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शूटिंगवेळी रक्तबंबाळ अवस्थेत पडल्यानंतरही वरुण धवनला झापत होते वडील, अभिनेता हंबरडा फोडत गेलेला गाडीत
तब्बल २७ वर्षांपूर्वी अभिनेत्रीच्या मागे नाचणारा रेमो आज बनलाय प्रसिद्ध कोरिओग्राफ्रर, व्हिडिओ केला शेअर
इंदिरा गांधींनंतर आणखी एक राजकीय भूमिका साकारणार कंगना, मधुर भांडाकर करणार चित्रपटाचे दिग्दर्शन