Thursday, April 18, 2024

‘कॅप्टन अमेरिका’ फेम क्रिस इवांसला डेट करतेय सेलेना गोमेज? एकेकाळी होता तिचा ‘क्रश’

मनोरंजन विश्वात कायमच कलाकारांच्या अफेरच्या बातम्या चर्चेत असतात. इथे प्रेमाच्या अफवा तयार व्हायला फार वेळ नाही लागत. कधी या अफवा अचानक खऱ्या होतात, तर कधी सर्व काही खोटे असल्याचे समोर येते. यामध्ये बॉलिवूड प्रमाणेच हॉलिवूडप्रेमी त्यांच्या आवडीच्या कलाकाराविषयी अशी माहिती शोधतच असतात. सध्या हॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका तसेच अभिनेत्री सेलेना आणि क्रिस इवांस या दोघांचे नाव चर्चेत आहे.

सेलेना आणि क्रिसच्या प्रेमाच्या अफवेला आले उधाण
काही वृत्तानुसार क्रिसने सेलेनाला सोशल मीडियावर फॉलो करायला सुरुवात केली आहे. या दोघांच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेटकऱ्यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे क्रिसने सेलेनाला इंस्टाग्राम अकाउंटवर फॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु गायिकेने त्याला अजून फॉलो बॅक केले नाही, हे देखील खरे आहे. तसेच हे दोघेही लवकरच एका आगामी चित्रपटामध्ये एकत्र झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे. (Selena Gomez dating Captain America fame Chris Evans? ever used to believe in my crush)

या चर्चेला आणखी जोर तेव्हा आला, जेव्हा या दोघांचे एकाच हॉटेलमधील काही फोटो समोर आले. दोघांचे फोटो जरी एकच हॉटेलमधले असले तरी, ते या दोघांनी वेगवेगळ्या दिवशी काढलेले आहेत. म्हणजे सेलेनाचा हा फोटो नोव्हेंबरमधील आहे, तर क्रिसचा हा फोटो ऑक्टोबर २०१३ मधील आहे.

सोशल मीडियामध्ये या दोघांवर सुरू असलेल्या चर्चेला उधाण आले असले, तरी या दोघांनी यावर अद्याप त्यांची कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सेलेना एकदा म्हणाली होती की, “क्रिस इवांस माझा क्रश आहे.” ही मुलाखत साल २०१५ मध्ये झाली होती. सध्या चाहत्यांना या दोघांना एकत्र पाहण्याची उत्सुकता लागली आहे. आता या सर्व चर्चा अफवा आहेत की, सत्य आहेत हे येणारा काळच आपल्याला सांगेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हिना खानचा ब्रेकअप? अभिनेत्रीच्या लेटेस्ट पोस्टमुळे चाहते पडले चिंतेत

-आर्यन खानला सकाळी ७ वाजता मिळणार जेलमधील जेवण, ‘या’ गोष्टीसाठी तरसणार शाहरुखचा मुलगा

-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा

हे देखील वाचा