Tuesday, June 18, 2024

रणवीर सिंगच्या आगामी चित्रपटासाठी ‘ही’ अभिनेत्री करू शकत नाही प्रतीक्षा, करण जोहरनेही गायले गुनगाण

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याचा बहुप्रतिक्षित ‘८३’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर तर या ट्रेलरने नुसता धुमाकूळ घातला आहे. ट्विटरवर ‘व्हाट ए रिलिज’ हा ट्रेंड चालू आहे. ट्रेलरमध्ये रणवीर सिंगचा अभिनय आणि भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंद सगळ्यांना आवडला आहे. केवळ प्रेक्षक नाही, तर अनेक कलाकार देखील ‘८३’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून हैराण झाले आहेत. सर्वत्र या चित्रपटाच्या टीमचे कौतुक चालले आहे.

रणवीर सिंगच्या या चित्रपटावर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अशातच माजी भारतीय खेळाडू कपिल देव याने ‘८३’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करून लिहिले आहे की, “माझ्या टीमची कहाणी, ‘८३’ चित्रपटाचा ट्रेलर हिंदीमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ३ डीमध्ये देखील उपलब्ध होणार आहे.” (Celebrities happily reacts in Ranveer Singh upcoming film 83 trailer directed by Kabir khan)

आर माधवन याने देखील सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करून ट्रेलरचे कौतुक केले होते. यासोबत त्याने रणवीर सिंगच्या अभिनयाचे कौतुक करत त्याला अप्रतिम म्हटले आहे.

बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर ट्विटरवर हा ट्रेलर शेअर करून लिहिले आहे की, “चित्रपटाचे कास्ट आणि संपूर्ण क्रू टीमचे अभिनंदन. हा ट्रेलर पाहून शहारे आले आहेत. ट्रेलर खूपच भावुक आणि उत्तेजित करणारा आहे.” त्याने दिग्दर्शक कबीर खान आणि रणवीर सिंगचे देखील कौतुक केले आहे.

अभिनेत्री आलिया भट्टने देखील तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला ट्रेलर शेअर करून लिहिले की, “हे पाहून माझ्या अंगावर शहारे आले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी मी जास्त वाट पाहू शकत नाही.”

यासोबत अनेकांना या चित्रपटाचा ट्रेलर खूप आवडला आहे. अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! ‘छोरी’ फेम नुसरतसोबत घडली विचित्र घटना, ३० सेकंदात सोडावं लागलं अभिनेत्रीला हॉटेल

-गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लगीनगाठ, मोजक्या लोकांच्या उपस्थित केले लग्न

-अरे देवा! पुन्हा पोस्टपॉन झालं आलिया अन् रणबीरचं लग्न, काय आहे नेमकं कारण?

हे देखील वाचा