तुम्ही अशा बातम्या ऐकल्याच आसतील ना की, प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी त्यांच्या मुलीचा फोटो शेअर केला. तिचे नाव मालती मेरी चोप्रा जोनस असं ठेवलंय, वैगरे वैगरे. मात्र, याचबरोबर तुम्ही असंही ऐकलं असेच ना की, त्यांनी सरोगसीमार्फत या मुलीला जन्म दिला आहे. तर ते काही पहिलं जोडपं नाही, ज्यांनी पालक बनण्यासाठी सरोगसीचा मार्ग अवलंबला आहे, यापूर्वीही काही सेलिब्रेटी जोडप्यांनी सरोगसीचा मार्ग स्वीकारत पालक बनण्याचे सुख पदरात पाडलंय, तर कोणती आहेत अशी जोडपी चला जाणून घेऊया…
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे एक सेलिब्रेटी जोडपं असून त्यांना १० वर्षांचा मुलगा विआन आहे, पण त्यांनी त्याच्या जन्माच्या ७ वर्षानंतर पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांच्या मुलीच्या जन्माची घोषणा केली. त्यांच्या मुलीचा जन्म सरोगसीमार्फत झाला असून त्यांनी तिचं नाव समिशा ठेवलंय. अनेकदा शिल्पा शेट्टी तिच्या दोन्ही मुलांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
View this post on Instagram
प्रीती झिंटा आणि जेन गुडइनफ
गालावरची खळी आणि गोड हास्य त्याचबरोबर सुंदर अभिनयाने अनेकांचे मन मोहून टाकणारी प्रीती झिंटा ही देखील सरोगसीचा मार्ग स्विकारत आई झाली. तिने आणि तिचा पती जेन गुडइनफ यांनी सरोगसीमार्फत जुळ्या मुलांचे स्वागत केले. त्यांनी मुलाचे जय आणि मुलीचे नाव जिया असे नाव ठेवलंय. प्रीती देखील अनेकदा त्यांच्या मुलांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
View this post on Instagram
सनी लिओनी आणि डॅनिएल वेबर
अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिएल वेबर २०१७ मध्ये निशाला दत्तक घेतले, तेव्हा चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पालक बनण्याचा निर्णय घेतलेला, पण यावेळी त्यांनी सरोगसी मार्फत दोन जुळ्या मुलांचे स्वागत केले. त्यांनी सोशल मीडियातून याची माहिती दिली होती. अशेर आणि नोह अशी नावही त्यांनी आपल्या मुलांना दिली आहेत.
View this post on Instagram
शाहरुख खान आणि गौरी खान
या यादीत बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांचाही समावेश आहे. गौरी आणि शाहरुख हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल असून अनेकांसाठी आदर्श देखील आहे. त्यांना याआधीच सुहाना आणि आयर्न ही मुले आहेत. पण २०१३ मध्ये ते पुन्हा तिसऱ्या मुलाचे पालक झाले, पण यावेळी त्यांनी तिसऱ्या मुलाच्या जन्मासाठी सरोगसीचा पर्याय निवडला होता. त्यांच्या तिसऱ्या मुलाचे नाव आब्रम असून तो अनेकदा शाहरुखबरोबर दिसतो.
View this post on Instagram
आमिर खान आणि किरण राव
केवळ शाहरुखच नाही तर मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान आणि त्याची एक्स पत्नी किरण राव यांचाही या यादीत समावेश आहे बरं का. तसं आमिरला त्याच्या पहिल्या लग्नापासून दोन मुलं आहेत. त्याने दुसरं लग्न किरण रावशी केलं होतं. लग्नानंतर त्याने आणि किरण यांनी २०११ मध्ये त्यांचा मुलगा आझाद याच्या जन्माचे स्वागत केले. आझादचा जन्म सरोगसीमार्फत झाला आहे. त्याच्या जन्मानंतर आता १० वर्षांनी आमिर आणि किरण वेगळे झाले आहेत.
श्रेयस तळपदे आणि दिप्ती तळपदे
केवळ बॉलिवूड स्टारच नाही, तर मराठमोळा कलाकार श्रेयस तळपदे याचे नावही या यादीत येते. श्रेयसचे २००४ मध्ये दिप्तीबरोबर लग्न झाले. त्यांनीही सरोगसीचा मार्ग स्विकारत आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला होता.
View this post on Instagram
त्यांनी २०१८ मध्ये त्यांची मुलगी आध्या हिच्या जन्माबद्दल माहिती दिली होती. तिचा जन्मही सरोगसीतून झाला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काळाच्या ओघात हरवलं ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचं सौंदर्य, ‘आशिकी’ फेम अभिनेत्रीचाही समावेश
एक- दोन लाखात खेळणाऱ्यातले नाहीत मांजरेकर, वाचा एका एपिसोडसाठी किती रुपये छापतात मराठी कलाकार
घरच्यांच्या विरोधाला न जुमानता धर्म बदलून संसार थाटणारे कलाकार, १३ जणांच्या नावाने यादी फुल्ल