Sunday, April 14, 2024

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या निर्घृण हत्येनंतर ‘या’ कलाकारांनी सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली

पंजाबी गायक असणारा सिद्धू मूसेवाला याची २९ मे रोजी गोळ्या मारत हत्या करण्यात आली. सिद्धू मूसेवालावर मनसाजवळ जवाहर नावाच्या गावाजवळ हमला झाला होता. प्राप्त माहितीनुसार सिद्धू मूसेवालावर हमला करणारे लोकं काळ्या गाडीतून आले होते, त्यांनी सिद्धू मूसेवालावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये मूसेवालासोबत आणखी दोन लोकं देखील जखमी झाली. या घटनेनंतर मूसेवालाला जखमी अवस्थेत मनसाच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले, मात्र इथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सिद्धू मूसेवालाच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर मनोरंजनविश्वात शोक पसरला आहे. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले आहे. कॉमेडियन कपिल शर्मा, एक्टर जिम्मी शेरगिल, शहनाज गिल, सिंगर विशाल डडलानी, अशोक पंडित, रणविजय सिंग आदींनी पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या.

कपिल शर्माने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले, “सतनाम श्री वाहेगुरु. खूपच हैराण आणि दुखी आहे. सिद्धू मूसेवाला एक महान कलाकार आणि उत्तम माणूस होता. देव त्याच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची ताकद देवो.” तर शेहनाज गिलने लिहिले, “कोणाचा तरुण मुलगा जगातून जाण्याइतके मोठे दुःख जगात कोणतेच नाही.वाहेगुरू दया कर.

आपल्या आयुष्यात सिद्धू मूसेवाला हा विवादित कलाकार राहिला. तो केवळ वयाच्या २८ व्या वर्षी हे जग सोडून गेला. सिद्धू मूसेवालाने २०१६ साली त्याच्या गायनाच्या करिअरची सुरुवात केली होती. त्याचे गाणे जेवढे प्रसिद्ध होते, तेवढाच त्यावर विवाद देखील व्हायचा. सिद्धू मूसेवाला हा त्याच्या गाण्यांमध्ये बंदुकांबद्दल गाणे गाण्यासाठी ओळखला जायचा. यामुळे तो अनेकदा अडचणींमध्ये देखील सापडला. त्याच्यावर धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप नेहमीच लागला.

प्राप्त माहितीनुसार सिद्धू मूसेवालाला गँगस्टर लोकांपासून खूप धमक्या मिळत होत्या. मात्र असे असूनही आम आदमी पार्टीच्या सरकारने कायदा आणि व्यवस्थेचे कारण देत एक दिवस आधीच सिद्धू मूसेवालासह ४२४ VIP लोकांची सुरक्षा काढली होती. सिद्धू मूसेवालाने पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आम आदमी पक्षाच्या विजय सिंगला विरोधात निवडणूक लढली होती. विजय सिंगलाने मूसेवालाला मनसा सीटमधून 63,323 मतांनी हरवत विजय मिळवला होता. निवडणूक हरल्यानंतर मूसेवालाने पंजाबच्या जनतेला गद्दार देखील म्हटले होते. यावरून देखील मोठा वाद निर्माण झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा