Friday, April 26, 2024

कलाकार आणि त्यांचे शिक्षण- तुम्हाला माहित का तुमचे आवडते कलाकार किती शिकले आहेत ते? नाही ना मग वाचा ही बातमी

बॉलिवूड स्टार नेहमीच त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत असतात. प्रेक्षकांना कलाकार आणि त्यांच्या खऱ्या आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी खूप उत्सूक असतात. बऱ्याच मुलाखतींमध्ये कलाकारांच्या आवडीनिवडी, छंद, आदी अनेक गोष्टींची माहिती लोकांना मिळत असते. पण तुम्हाला माहित आहे का, चित्रपटांमध्ये अनेक मोठ्या मोठ्या, उद्योगपती , वकील, डॉक्टर अशा अनेक भूमिका साकारणारे कलाकार खऱ्या जीवनात किती शिकलेले आहेत? चला तर आज आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्या आवडीच्या कलाकारांचे शिक्षण किती झाले आहे.

परिणीति चोप्रा :
शिक्षण – बिजनेस, इकोनॉमिक्स, फायनान्स मध्ये ट्रिपलग्रज्युएट, मॅंचेस्टर बिझनेस स्कुल, लंडन.

‘लेडीज वर्सेज रिक्की बहल’ सिनेमातून बॉलीवुडमध्ये डेब्यू करणारी परिणीति चोप्रा तिच्या सहज, सुंदर अभिनयासाठी ओळखली जाते. मात्र परिणीती अभिनयासोबतच अभ्यासातही भरपूर हुशार आहे. तिने अंबालाच्या कॉन्वेंट स्कुल मधून शिक्षण घेतले असून पदवीचे शिक्षण तिने लंडनमधून पूर्ण केले आहे. तिच्याकडे आज इकोनॉमिक्स, बिजनेस आणि फायनान्स अशा महत्वाच्या आणि मोठ्या डिग्री आहे. अभिनयात येण्यापूर्वी परिणितीला इन्वेस्टमेंट बँकर व्हायचे होते.

अमिताभ बच्चन
शिक्षण – क्वींसलँड यूनिवर्सिटी ऑस्ट्रेलियाकडून डॉक्टरेटची उपाधी

बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांचे शालेय शिक्षण इलाहाबादमधून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण नैनीतालच्या शेरवुड कॉलेजमधून पूर्ण केले. मग त्यांनी किरोड़ीमल कॉलेजमधून आर्ट्स आणि सायन्सची डिग्री मिळवली. अभिनेता झाल्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलियाच्या क्वींसलॅंड यूनिवर्सिटीने डॉक्टरेट ही उपाधी देत त्यांचा सन्मान केला.

प्रीति झिंटा
शिक्षण – पोस्ट ग्रेजुएशन इन क्रिमिनल साइकोलॉजी

बॉलिवूडची डिंपल गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रीती देखील उच्चशिक्षित आहे. प्रीति झिंटाने तिचे शालेय शिक्षण शिमलाच्या एका कॉन्वेंट स्कुलमधून पूर्ण केले. इंग्लिश ऑनर्समध्ये पदवी संपादन केल्यानंतर तिने साइकॉलोजीचे शिक्षण पूर्ण केले. पदवी मिळवल्यानंतर तिने क्रिमिनल साइकोलॉजीमध्ये पोस्ट ग्रेजुएशन केले. मात्र त्यानंतर ती मॉडेलिंगकडे वळली आणि त्यात तिने यशाची अनेक शिखरे पार केली आहेत.

विद्या बालन
शिक्षण – मास्टर्स इन सोशिऑलॉजी, मुंबई

हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय सुंदर आणि उत्तम अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या विद्याच्या शकुंतला देवी या सिनेमात तिने मेथमॅटिक्स एक्सपर्टची भूमिका साकारली होती. पण तुम्हाला माहित आहे का कि, विद्या तिच्या खऱ्या आयुष्यातही अभ्यासू अभिनेत्री आहे. शालेय शिक्षण पूर्ण करत असतानाच विद्याने झी टीव्हीच्या हम पांचमध्ये काम करणे सुरु केले. अभिनयात यश मिळत असतानाही तिने अभ्यासासाठी अभिनयातून ब्रेक घेतला होता. तिने मुंबईच्या सेंट जेवियर कॉलेजमधून सोशिऑलॉजीमध्ये ग्रॅजुएशन पूर्ण केले आणि पुन्हा अभिनयात करियरला सुरुवात केली.

अमीषा पटेल
शिक्षण – ग्रॅज्युएशन इन इकॉनॉमिक्स, यूनाइटेड स्टेट

कहो न प्यार है या सुपरहिट चित्रपटातून अभिनयात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल. आमिषाने इकोनॉमिक्समध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे. शिवाय तिने बायोजेनेटिकमध्ये इंजीनियरिंगचा सुद्धा अभ्यास केला आहे. त्यानंतर तिने इकॉनॉमिक्सचा अभ्यास देखील सुरु केला. १९९२-९३ सालात अमिषा मुंबईतील कॅथीड्रल एंड जॉन कॅनन स्कुलमध्ये शिकत होती.

शाहरुख खान
शिक्षण – इकोनॉमिक्स ग्रेजुएट, हंसराज कॉलेज

बॉलीवुडचा बादशहा शाहरुख खानने त्याच्या अभिनयाच्या जोरावर किंग खान हे बिरुद मिळवले. पण तुम्हाला माहित आहे का शाहरुख अभिनयाइतकाच अभ्यासातही हुशार आहे. शाहरुखचे शालेय शिक्षण सेंट कोलंबस स्कूलमधून झाले आहे. शाळेत त्याचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स असल्याने त्याला स्वॉर्ड ऑफ ऑनर अवॉर्ड देखील मिळाला आहे. शाहरुखने हंसराज कॉलेजमधून इकोनॉमिस्क या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने दिल्लीच्या जामिया मीलिया इस्लामिया यूनिवर्सिटीमधून मास कम्युनिकेशन विषयात मास्टर्ससाठी प्रवेश घेतला होता. मात्र या दरम्यान त्याला अभिनय करण्याची संधी मिळाली आणि त्याचे शिक्षण अर्धवट राहिले.

हे देखील वाचा