Wednesday, July 3, 2024

‘चक दे इंडिया’ची अजून एक अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, व्हायरल फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव

सध्या मनोरंजन विश्वामध्ये लग्नसराई सुरु झाली आहे. नुकतंच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे जोडपं लग्नबंधनात अडकले आहेत तर काही दिवसांपूर्वीच अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल या जोडप्याचाही शुभ विवाह थाटामाटात पार पडला. अशताच ‘चक दे इंडिया‘ फेम अभिनेत्रीने देखिल गुपचुप लग्नसोहळा उरकला आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

कोरोना काळापासून मनोरंजन विश्वातील अनेक जोडप्यांनी आपल्या नात्याला नाव दिलं आहे. 2022 प्रमानेच 2023 मध्येही अनेक कलाकार आपल्या जोडीदारासोबत नवीन सुरुवात करत आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहरु खान (Shaharukh Khan) स्टारर ‘चक दे इंडिया’ (Chak De India) चित्रपटामधील अभिनेत्री विवाह बंधनात अडकली तर नुकतंच अजुन एक अभिनेत्री म्हणजे बलबीर कौरची भूमिका निभावणारी प्रसिद्ध अभिनेत्री तान्या अब्रोल (Tanya Abrol) गुपचुप लग्न बंधनात अडकली आहे.

तान्या गेल्या अनेक दिवसांपासून तिचा बॉफ्रेंड आशिष वर्मा (Ashish Varma)ला डेट करत होती. शेवटी या जोडप्यानी गुरुवार (दि, 9 फ्रेब्रुवारी) रोजी सात फेरे घेऊन नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. या लग्नामध्ये टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक (Rubina Dilaik) आणि अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) या जोडप्याने हजेरी लावली होती. त्याशिवाय त्यांनी आपल्या सोशल मीडियावर काही फोटो देखिल शेअर केले आहेत जे तुफान व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

अभिनवने शुक्रवारी फोटो शेअर करत तान्याच्या लग्नाचे फोटो शेअर करत लिहिले की, “आम्ही अनेक वर्षे एकाच छताखाली घालवले. तू लहान आहेस पण जास्त हुशार आहेस आणि मी जास्त मजेदार आहे. आयुष्यात चढ-उतार आले, पण तू एक बहीण, मित्र आणि आधार बनून राहिलीस. तान्या अब्रोल, तुला वधूच्या रूपात पाहून आनंद झाला.”

तान्याने चकदे इंडिया चित्रपटानंतर टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम सीआयडी मध्येही पाहायला मिळाली. मात्र, तीला खरी ओळख ‘चक दे इंडडिया’मधून मिळाली होती. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये तान्या लागल रंगाच्या घगऱ्यामध्ये दिसत आहेत तर अभिनवने वेडिंगसाठी ग्रे पँटसोबत हाय-नेक शर्ट घातला होता. आणि रुबिना काळ्या आणि सोनेरी रंगाच्या डिझायनर साडीत दिसत होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-

हे देखील वाचा