हिंदी अभिनेत्रीमुळे ‘चला हवा येऊ द्या’ फेम ‘या’ कलाकारला होतोय मनस्ताप, पोस्ट शेअर करत दिली माहिती


फॅन्स नेहमीच त्यांच्या आवडत्या कलाकारांसाठी क्रेझी असतात. त्यांना सोशल मीडियावर मेसेज करणे, त्यांच्या घराबाहेर थांबणे, त्यांना बेहटण्यासाठी सेटवर पोहचणे, त्यांचा नंबर मिळवणे, कॉल करणे आदी अनेक गोष्टी ते करताना आपल्याला दिसतात. मात्र कधी कधी फॅन्सच्या काही हरकतींमुळे कलाकरांना प्रचंड मनस्ताप होतो. आपल्याकडे एक म्हण आहे, ‘करे कोई और भरे कोई.’ याच म्हणीचा प्रत्यय सध्या ‘चला हवा येऊ द्या फेम तुषार देवलला येत आहे. ‘चला हवा येऊ द्या कार्यक्रमात आपल्या संगीताने आणि कधी कधी जबरदस्त कॉमेडीने तडक लावणाऱ्या तुषारने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून केलेली पोस्ट सध्या खूपच चर्चेत आली आहे.

एका हिंदी अभिनेत्रींमुळे तुषारचा मोबाइल नंबर व्हायरल झाला आणि त्याला भरपूर कॉल येऊ लागले आहेत. या फोनमुळे त्याला प्रचंड त्रास होत असून, याबाबतची पोस्ट त्याने शेअर केली आहे. शहार्ने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नमस्कार, मी तुषार देवल गेले काही दिवस मला खूप फोन येत आहेत.. त्यामुळे मी प्रचंड त्रस्त झालो आहे. या सगळ्याचं कारण आहे एका हिंदी मालिकेतील अभिनेत्री (ख्याती जोशी) उर्फ गुलरी जोशी. तिने तिच्या एका यूट्यूब इंटरव्ह्यूमध्ये तिचं CINTAAचं कार्ड दाखवलं. ज्यामध्ये माझा मोबाईल नंबर दाखवला गेला मला गुलकी जोशी असल्याचे समजून दिवसाला जवळपास १०० च्या वर कॉल येत आहेत. ही सर्व माहिती त्या अभिनेत्रीपर्यंत माझ्या एका मित्राच्या माध्यमातून पोहोचवली. त्यावर तिने त्या यूट्यूब चॅनेलच्या व्हिडीओतील माझा नंबर ब्लर केला. पण तोपर्यंत हा व्हिडीओ ६ हजार लोकांनी पाहिला होता. त्यामुळे मला अजूनही कॉल येत आहेत. बरं या सगळ्या प्रकरणानंतर मॅडमने मला सॉरी म्हणालायला तरी कॉल करायला पाहिजे होता. तो अद्याप आलेला नाही… तरी या प्रकरणातून मार्ग कसा काढता येईल गुलकी जोशी मॅडम CINTAA मॅडम सर, सोनी सब.”

ही पोस्ट त्याने गुलकी जोशी आणि सोनी सबला देखील टॅग केली असून, यावर अजून गुलकी कडून कोणतेही उत्तर आले नाहीये.

हेही वाचा- 


Latest Post

error: Content is protected !!