Sunday, May 19, 2024

सायना नेहवालवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या सिद्धार्थच्या वाढल्या अडचणी, पोलिसांनी केली कारवाई

दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने (Siddharth) काही दिवसांपूर्वी, देशाला देशाला अभिमान वाटणाऱ्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालबद्दल (Saina Nehwal) एक वादग्रस्त ट्वीट केले होते. ज्यामुळे त्याला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. या प्रकरणात आता त्याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण आता पोलिसांनी अभिनेत्यावर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थला त्याच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल चेन्नई पोलिसांनी समन्स बजावले आहे.

सायनाविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट केल्याबद्दल सिद्धार्थला समन्स
चेन्नईचे पोलीस आयुक्त शंकर जीवाल यांनी अधिकृत निवेदन जारी केले आहे की, “अभिनेता सिद्धार्थला बॅडमिंटनपटू सायना नेहवालवरील आक्षेपार्ह ट्वीटसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. कारण आमच्याकडे या संदर्भात २ तक्रारी आल्या आहेत आणि या प्रकरणी आम्हाला त्याचे म्हणणे नोंदवायचे आहे.” यानंतर देशभरातील लोक अभिनेत्याला ट्रोल करत होते आणि शिवीगाळ करत होते.

सिद्धार्थने मागितली सायनाची माफी
या प्रकरणाला अधिक वजन मिळाल्यानंतर सिद्धार्थने आणखी एका पोस्टद्वारे सायना नेहवालची माफी मागितली होती. त्याने आपल्या माफीनाम्यात लिहिले की, “प्रिय सायना, मला माझ्या आक्षेपार्ह ट्वीटबद्दल तुझी माफी मागायची आहे. जे मी तुझ्या ट्वीटला प्रतिसाद म्हणून लिहिले आहे. मी तुझ्याशी अनेक गोष्टींवर असहमत असू शकतो. पण मी वापरलेले शब्द आणि स्वर, अगदी रागाच्या भरात किंवा निराशेनेही, समर्थनीय होऊ शकत नाही. मला माहित आहे की, माझ्याकडे यापेक्षा अधिक सभ्यता आहे. जर एखादा विनोद तुला समजावून सांगावा लागला, तर ते चांगले होणार नाही हे समजू शकते. त्या विनोदाबद्दल मी तुझी माफी मागतो.”

सिद्धार्थने सायनाबद्दल का केली कमेंट?
सायनाने पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत पोस्ट जारी केली होती. त्यात तिने लिहिले की, “पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड केली तर, कोणताही देश सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. याचा मी तीव्र शब्दात निषेध करते.” सायनाच्या या पोस्टवर खुद्द सिद्धार्थने वादग्रस्त कमेंट केली होती. ती म्हणाली होती की, “मला कळत नाही त्याला काय म्हणायचे आहे. मला तो अभिनेता म्हणून आवडायचा पण तो चांगला नव्हता. योग्य शब्दांतूनही तो आपले म्हणणे मांडू शकला. त्याने बोललेल्या शब्दांबद्दल माफी मागितली असली तरी लोकांचा राग कमी झाला नाही. म्हणून कोणीतरी पोलिसात गुन्हा दाखल केला, त्यानंतर त्याला समन्स बजावण्यात आले आहे.”

अभिनेता सिद्धार्थ हा बॉलिवूड चित्रपट ‘रंग दे बसंती’मधील उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. तो बॉलिवूड चित्रपटांसह दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही दिसला आहे. या वादानंतर अभिनेता सिद्धार्थला सोशल मीडियावर युजर्सच्या द्वेषाचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा