Tuesday, March 5, 2024

‘पेन किलरही काम करत नाहीये…’, ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देणार्‍या छवी मित्तलची भावुक पोस्ट

टेलिव्हिजन अभिनेत्री छवी मित्तलने (Chhavi Mittal) काही दिवसांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरची माहिती देऊन सगळ्यांनाच धक्का दिला होता. त्यानंतर नुकतीच तिच्यावर ब्रेस्ट कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर होणारा त्रास किती भयानक आणि वेदनादायी असतो, याचा अनुभव नुकतेच तिने एका पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला होता. शस्त्रक्रियेनंतर केलेल्या एका लांबलचक पोस्टमध्ये तिने ‘वेदना एवढी वाढली आहे की, कोणत्याही पेन किलरचा देखील परिणाम दिसत नाही,’ असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. 

सध्या स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत असलेल्या छवी मित्तलने हॉस्पिटलमधून हसत हसत एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टद्वारे ती वेदनांमधून कशी सावरत आहे, हे सांगितले आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत तिने, “आपण वेदना किती लवकर विसरतो हे आश्चर्यकारक आहे. सी-सेक्शन नंतर मला जाणवलेली वेदना किंवा वर्षापूर्वी मला अंडाशयाच्या शस्त्रक्रियेनंतर जाणवलेली वेदना किंवा माझ्या पाठीच्या दुखापतीची वेदनादायक वेदना जी बरी झाली आहे.” असा कॅप्शन देत तिच्या आजाराबद्दल सांगितले आहे.

याबद्दल बोलताना पुढे बोलताना, “मी शक्य तितके संदेश वाचत आहे, याबद्दल धन्यवाद. माझ्या सर्जनने मला कोणतीही डान्स रील पोस्ट करू नये म्हणून सक्त मनाई केली आहे पण आता मी ते करू शकत नाही,” असे म्हणले आहे.  यासोबतच ती बरी होत असल्याचेही तिने सांगितले आहे.

दरम्यान अभिनेत्री छवीला स्तनाच्या कर्करोगाची माहिती मिळाली, जेव्हा ती जिममध्ये वर्कआउट करत होती आणि चुकून तिच्या स्तनाला दुखापत झाली. ती डॉक्टरांना ही जखम दाखवायला आली तेव्हा स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. यानंतर तिने सोशल मीडियावर चाहत्यांना माहिती दिली, त्यानंतर चाहते तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री ते खासदार असा आहे किरण खेर यांचा प्रवास, पतीच्या मदतीने कॅन्सरलाही दिली मात

जागतिक कर्करोग दिन: फक्त सुशांतसिंग नव्हे, कॅन्सरशी लढणाऱ्या पडद्यावरील ‘या’ भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात

हे देखील वाचा