Friday, April 26, 2024

मेकअपमुळे ‘या’ अभिनेत्रीच्या शरीराची लागली वाट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘मेकअप नको रे बाबा!’

आपण आजपर्यंत अनेक चित्रपट पाहिले आहेत. यामध्ये कलाकारांनी साकारलेल्या भूमिका, त्यांचे सौंदर्य हे आपल्याला भावल्याशिवाय राहत नाही. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? की, चित्रपटांमध्ये कलाकारांना खूप सुंदर किंवा खूप कुरूप दिसण्यासाठी मेकअपचा सर्वात मोठा हात असतो. यामुळे काही वेळा कलाकारांना भलताच महागात पडतो आणि त्याचे वाईट परिणामही भोगावे लागतात. असेच काहीसे एका अभिनेत्रीसोबत घडले. चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्रीने प्रोफेशनल मेकअप केला आणि त्यानंतर तिला प्रचंड समस्यांचा सामना करावा लागला.

यानिया भारद्वाजचा भयावह लूक
आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, ती अभिनेत्री इतर कोणी नसून यानिया भारद्वाज आहे. तिने ‘छोरी’ या भयपटात छोटी माईची भूमिका साकारली. चित्रपटात तिला भूताचा लूक देण्यासाठी प्रोस्थेटिक्सचा वापर करण्यात आला होता. त्यामुळेच तिची तब्येत इतकी खराब झाली होती की, तिला थेट रुग्णालयाचे दार ठोठवावे लागले. चित्रपटातील आपल्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल बोलताना म्हटले की, कमीत कमी तीन ते चार तास प्रोस्थेटिक्समध्ये लागायचे. हे काढण्यासाठीही २ तास जात होते. मला सेटवर इतरांपेक्षा लवकर पोहोचावे लागत होते.

जेवण करतानाही व्हायचा त्रास
यानियासाठी भूताचे रूप मिळवणे हा खूप कठीण प्रवास होता. यानिया सांगते की, “हा लूक खूपच अवघड होता. स्क्रीनवर दिसतो त्यापेक्षा कितीतरी जास्त कठीण. अंगावर हे सर्व घेणे, त्रासदायक ठरले. माझ्यासाठी तो एक वॅक्सिंग अनुभवासारखा होता. ते काढताना पोटाभोवतीचे छोटे केस बाहेर यायचे. कधी पुरळ यायचे, तर कधी त्यातून रक्त यायला लागायचे. माझे काम, हात आणि चेहरा प्रोस्थेटिक्सने झाकलेले होते. मला जेवताही येत नव्हते. मला रोज वेदनाशामक औषधे घ्यावी लागत होती. कधी कधी ताप यायचा.”

सुजली होती फुफ्फुसे
“माझ्या फुफ्फुसावर सूज आली होती, त्यामुळे मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. खूप कमी लोकांना प्रोस्थेटिक्स करून घेण्याची संधी मिळते आणि मी त्यापैकी एक होते. मी स्वतःला भाग्यवान समजते. सिनेमाच्या दुनियेत प्रोस्थेटिक म्हणजे तुम्ही कसे दिसाल याचा अर्थ नाही, तर तुम्ही त्यात कसा अभिनय करता हे महत्त्वाचे आहे,” असेही ती पुढे म्हणाली.

“मला माहित नव्हते की, प्रोस्थेटिक माझे शरीर आणि आरोग्य खराब करेल. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी मी काहीही खाऊ शकले नाही. मी काहीही पिऊ शकत नव्हते. कारण, जे काही खाणेपिणे होते ते सर्व शरीरातून बाहेर पडत होते. मला सॅलडही पचत नव्हते,” असे आपल्या जेवणाबाबत बोलताना यानिया पुढे म्हणाली.

यानियाला आहे तलवारबाजीचे ज्ञान
अभिनयाच्या जगात येण्याबाबत यानिया म्हणाली की, “माझ्या लहानपणी मला वाटायचे की, अभिनय म्हणजे स्टार बनणे. मी टीव्हीवर चित्रपट बघत मोठी झाले. मला वाटायचं की, अभिनेत्री असणं म्हणजे छान दिसणं आणि नाचणं. तुम्हाला प्रेक्षकांशी जोडावे लागेल, हे मला माहिती नव्हते. माझे स्वप्न एका योद्ध्याची भूमिका साकारण्याचे होते. मला तलवारबाजी माहित आहे आणि मला आशा आहे की, मी त्यात भूमिका करू शकते.”

यानियाच्या या चित्रपटाबाबत बोलायचं झालं, तर हा चित्रपट ऍमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात यानियाव्यतिरिक्त नुसरत भरुचाचाही समावेश आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन हे विशाल फुरिया यांनी केले आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा