चिंकी मिंकीने लावले ‘फकीरा’ गाण्यावर ठुमके, व्हायरल होतोय व्हिडीओ

chinki minki surabhi & samriddhi dance on fakira song get viral


‘द कपिल शर्मा शो’मध्ये आलेल्या चिंकी मिंकी म्हणजचे सुरभि आणि समृद्धि सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन त्या नेहमी चाहत्यांशी सतत संपर्कात राहतात. चिंकी मिंकीने आपल्या अभिनयाबरोबरच डान्सनेही लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, यात त्या दोघी कॅटरिना कैफच्या ‘फकीरा’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये चिंकी मिंकीची शैली आणि त्यांच्या डान्स स्टेप्स खरोखरच बघण्यासारख्या आहेत.

चिंकी मिंकीने हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच, आतापर्यंत या व्हिडीओला 65 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यासह, चिन्की मिंकीच्या व्हिडिओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत. तसेच त्यांचे जोरदार कौतुकही करीत आहेत. व्हिडिओमध्ये चिंकी मिंकीने एक करड्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे, ज्यामध्ये त्यांचा लुक जबरदस्त दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करताना सुरभि समृध्दीने लिहिले आहे की, “आम्ही गाण्यावर नाचत आहोत”. चिंकी मिंकीने त्यांच्या डान्सद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्या दोघी बर्‍याच व्हिडिओंमुळे चर्चेत राहिल्या आहेत.

चिंकी मिंकी म्हणजेच सुरभि समृद्धी सध्या सब टीव्हीवर येणाऱ्या ‘हीरो’ शोमध्ये मुख्य भूमिकेत आहे. या शोमध्ये त्या स्वीटी आणि मिठीची भूमिका साकारत आहेत. चिंकी मिंकीच्या कारकीर्दीबद्दल बोलताना त्यांनी ‘द कपिल शर्मा शो’मधुन त्यांची ओळख निर्माण केली होती. या शोमध्ये कपिल शर्मा आणि अर्चना पूरन सिंग देखील या दोघींचा अभिनय पाहून आश्चर्यचकित झाले होते.

 


Leave A Reply

Your email address will not be published.