नॅशनल टीव्हीवर सुपरस्टार रजनीकांतची नक्कल करताना दिसलाे चिरंजीवी, व्हिडिओ झाला व्हायरल

साऊथ इंडस्ट्रीतील दोन सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) आणि चिरंजीवी (Chiranjeevi) हे एकमेकांचे जवळचे मित्र असल्याचे म्हटले जाते. दोघांमधील बॉन्डिंग सर्वांनाच माहिती आहे. नुकतेच पुन्हा एकदा त्यांच्या मैत्रीचे दर्शन घडले आहे, जे पाहून चाहते वेडे होत आहेत. चिरंजीवींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते त्यांचा जवळचा मित्र रजनीकांतची कॉपी करताना दिसत आहेत.

खरं तर, सुपरस्टार चिरंजीवी नुकतेच सिंगिंग रियॅलिटी शो ‘तेलुगु इंडियन आयडल’मध्ये पोहोचले होते. या शोच्या फिनालेमध्ये ते पाहुणे म्हणून आले होते आणि राणा डग्गुबती (Rana Daggubati) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) त्यांच्या ‘विराट पर्वम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. या दरम्यान सर्वांनी खूप मजा केली. (chiranjeevi imitated rajinikanth in a viral video)

शोमध्ये जेव्हा चिरंजीवीला विचारण्यात आले की, ते रजनीकांतची कॉपी करू शकतात का? याला सुपरस्टारने लगेचच होकार दिला आणि रजनीकांतच्या स्टाईलमध्ये सगळ्यांनाच चकित केले. व्हिडिओमध्ये ते कधी रजनीकांत सारखे केस सावरताना दिसत आहेत, तर कधी त्यांच्यासारखा चष्मा घालताना दिसत आहेत. एवढेच नाही, तर तो रजनीकांतप्रमाणे चालतानाही दिसले. चिरंजीवींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चाहते त्याच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एवढेच नाही, तर काही नेटकऱ्यांना चिरंजीवीने सुपरस्टार रजनीकांत यांच्या बायोपिकमध्ये काम करावे असे वाटते.

चिरंजीवी हे साऊथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार आहेत, यात शंका नाही. मात्र, त्यांचा नुकताच आलेला ‘आचार्य’ हा चित्रपट पडद्यावर काही खास कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटात त्यांचा मुलगा राम चरण (Ram Charan) देखील त्यांच्यासोबत होता आणि हा चित्रपट पडद्यावर हिट ठरेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post