Wednesday, July 3, 2024

स्वत:च्याच लग्नात ‘या’ अभिनेत्रीला ओढणी अन् नेकलेसचंही नव्हतं भान, फुल पिऊन लावलेले ठुमके

लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खास क्षण असतो. मग ती सामान्य मुलगी असो किंवा बॉलिवूडमधील कोणतीही अभिनेत्री. बॉलिवूड कलाकारांच्या लग्नातील थाट कसा असतो, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सामान्य कुटुंबातील लग्न एक-दोन दिवसात आटोपतात. मात्र, बॉलिवूडकरांची लग्न ही अनेक दिवस सुरूच असतात. यांच्या लग्नाच्या चर्चा दूरदूरपर्यंत चालतात. असेच एक लग्न २००४मध्ये झाले होते, ज्यात बॉलिवूडमधील प्रत्येक लहान-मोठा कलाकार सामील झाला होता. यातील मेहंदी, संगीत सगळंच झक्कास होतं. मात्र, नवरी मुलगी तिच्याच लग्नात पिऊन बेधुंद झाली होती. तिला कोणत्याच गोष्टीचे भान नव्हते.

ही नवरी इतर कुणी नाही, तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान (Farah Khan) होती, जी तिच्याच लग्नात पिऊन राणी मुखर्जी आणि प्रियांका चोप्रा हिच्यासोबत डान्स करत होती.

फराह खान हिने शेअर केला थ्रोबॅक फोटो
कोरिओग्राफर फराह खान (Farah Khan) नेहमीच तिचे जुने फोटो शेअर करत असते. आता तिने तिच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे, जो संगीत समारंभातील आहे. फोटोत ती संगीताच्या कार्यक्रमात बेधुंद होऊन डान्स करताना दिसत आहे. या फोटोत तिच्यासोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि राणी मुखर्जी (Rani Mukherji) यादेखील दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)

फराहने १८ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत सुंदर कॅप्शन दिले आहे. तिने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “नशेत एक नवरी तिच्या संगीतावर प्रियांका आणि राणीसोबत डान्स करताना. जिला तिच्या ओढणी आणि नेकलेसचेही भान राहिले नाही.”

कधी झाले फराहचे लग्न?
फराहचे लग्न सन २००४मध्ये झाले होते. तिने दिग्दर्शक शिरीष कुंदर याच्याशी संसार थाटला होता. तिच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक कलाकार पोहोचले होते. आता फराह ही ३ मुलांची आई बनली आहे. तिने एकसोबत तीन मुलांना जन्म दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
एक्स पत्नीविरुद्ध खटला जिंकल्यानंतर पुन्हा चर्चेत आला जॉनी डेप, पेंटिंग्स विक्रीतून कमावले ‘एवढे’ कोटी
सचिनच्या लेकीचा शॉपिंगचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरीही म्हणाले, ‘पैशांची कमाल बाबू भैय्या’
‘बिग बॉस’ फेम डिम्पी गांगुली तिसऱ्यांदा झाली आई, शेअर केला नैसर्गिक प्रसूतीचा अनुभव

हे देखील वाचा